Goa Fish Market Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: मडगावात घाऊक मासळी मार्केट जागेबद्दल विक्रेत्यांमध्ये संभ्रम!

Goa Fish Market: सध्याच्या एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Fish Market: सध्याच्या एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे घाऊक मासळी मार्केट तात्पुरते स्थलांतरित करण्यासाठी एसजीपीडीएचे अध्यक्ष आमदार दाजी साळकर यांच्यासह मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डा मल्टीपर्पज मैदानानजीकची जागा निश्र्चित केली आहे.

मात्र, या जागेबद्दल घाऊक मासळी विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घाऊक मासळी मार्केटच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी जी जागा निवडली आहे, त्या जागेत स्वच्छता काम सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे मार्केट स्थलांतरित व्हायला पाहिजे.

पण सध्याच्या कामाची गती पाहता व काही प्रमाणात या जागेसाठी विरोधही होत असल्याने स्थलांतरणाचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तात्पुरत्या जागेत साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार असून हा खर्च नेमका कोण करणार, याबद्दलही संभ्रम आहे. तात्पुरत्या मार्केटमध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दलची माहिती विक्रेत्यांना हवी आहे.

...तर किरकोळ मासळी विक्रीवर परिणाम

हल्लीच ट्रॉलरमालक, पारंपरिक रापणकार व स्थानिक मासळी विक्रेत्यांनी एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांची भेट घेऊन स्थलांतरण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शिवाय नवीन घाऊक मार्केटच्या जागेत काय व्यवस्था केली आहे याचीही माहिती घेतली. तात्पुरते घाऊक मासळी मार्केट व किरकोळ मासळी मार्केट जवळच असल्याने किरकोळ मासळी विक्रेत्यांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT