Goa Diwali Festival | Narkasur Dainik Gomantak
गोवा

Goa Diwali Festival: गोवातील मडगावचे भवानी हौशी मंडळ पहिले!

Goa Diwali Festival: भवानी हौशी मंडळ मडगाव या संस्थेने तब्बल 1 लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले.

दैनिक गोमन्तक

Goa Diwali Festival: फातोर्डा युवा शक्तीने आयोजित केलेल्या अखिल गोवा श्रीकृष्ण विजय उत्सव स्पर्धेत भवानी हौशी मंडळ मडगाव या संस्थेने 1 लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले. 75 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस नागेशी युथ क्लब, नागेशी-बांदोडा यांना, तर 50 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस साई युवा मंडळ हाउसिंग बोर्ड मडगाव या संस्थेला प्राप्त झाले. या स्पर्धेत एकूण 4 लाख रुपयांची बक्षिसे होती.

अखिल गोवा श्रीकृष्ण विजय उत्सव स्पर्धेचे निकाल असे आहेत: ‘सर्वोत्कृष्ट नरकासुर’ गटात प्रथम- भवानी हौशी मंडळ, मडगाव, द्वितीय- नागेशी युथ क्लब, नागेशी-बांदोडा, आणि तृतीय- साई युवा मंडळ, हाउसिंग बोर्ड-मडगाव यांनी पारितोषिके पटकावली.

अप्पिकुर युवक संघ, शिरोडा, ओंकार हौशी मंडळ, कोंब-मडगाव, शिव कामाक्षी महामाया, शिरोडा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. सर्वोत्कृष्ट कृष्ण गटात प्रथम- भवानी हौशी मंडळ, मडगाव, द्वितीय- श्रीकृष्ण कला मंडळ, रुमडामळ-दवर्ली आणि तृतीय- हरी ओम हरी, बोर्डा-मडगाव यांनी पारितोषिके पटकावली.

पारंपरिक नरकासुर गटात शिव कामाक्षी महामाया, शिरोडा, शिवम स्पोर्ट्‌स क्लब, शिरोडा आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्‌स अँड कल्चरल क्लब यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट संगीत गटात साई युवा मंडळ, हाऊसिंग बोर्ड-मडगाव, नागेशी युथ क्लब, नागेशी-बांदोडा व श्रीकृष्ण कलामंडळ, रुमडामळ, दवर्ली यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात आली.

फातोर्डाचे आमदार व फातोर्डा युवा शक्तीचे प्रमुख विजय सरदेसाई, अध्यक्ष राजू नाईक, लिंडन परेरा, फ्रान्सिस जोयनेस, विटोरिनो तावारीस, निमिषा फालेरो, सदानंद नाईक, गोवा फॉरवर्ड पार्टीचे संघटनमंत्री दुर्गादास कामत, माजी नगरसेवक ग्लेन आंद्राद, रामदास हजारे आणि गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व चिंचोणेचे पंच फ्रँकी व्हिएगस यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT