Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Margao Drugs Case: मडगावात 2.5 लाखांचे ड्रग्ज जप्त, उत्तर प्रदेशातील युवकाला अटक

‘एएनसी’ची कारवाई ः उत्तरप्रदेशच्या युवकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Drugs Case मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाजवळ छापा टाकून गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) उत्तर प्रदेशातील २१ वर्षीय युवकाला अटक केली. त्याच्याकडून २.५ लाख रुपये किमतीचा २ किलो गांजा आणि ५ ग्रॅम मेथाम्पेटामाइन जप्त केले.

मडगाव येथील न्यायालयाने संशयित युवकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांनी दिली.

एएनसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थ तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या खबऱ्यांनी अंमलीपदार्थविरोधी पथकाला दिली होती.

त्यानुसार या भागात पथकाच्या साध्या वेशातील पोलिसांनी सापळा लावला होता. या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर, हवालदार प्रमोद कळंगुटकर, नीतेश मुळगावकर, लक्ष्मण म्हामल, संदेश वळवईकर, साईराज नाईक, मंदार नाईक, कुंदन पटेकर व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

पोलिसांनी या ड्रग्जचे वजन केले असता गांजा २ किलो होता तर मेथाम्पेटाईन ५ ग्रॅम होते. या दोघांची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटात सुमारे २.५० लाख रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर यांनी संशयित युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT