Goa Municipality | Collector Jyoti Kumari Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: मडगावातील धोकादायक इमारती पाडा- ज्योती कुमारी

Goa News: मडगाव पालिकेने यापूर्वी शहरांतील 18 जुन्या इमारती धोकादायक ठरविल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: मडगाव शहरात धोकादायक स्थितीत ज्या इमारती आहेत त्या खाली करून पाडण्याची प्रक्रिया मडगाव पालिकेने हाती घ्यावी, अशी सूचना दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मानुयेल बार्रेटो यांना दिल्या आहेत.

मडगाव पालिकेने यापूर्वी शहरांतील 18 जुन्या इमारती धोकादायक ठरविल्या होत्या. त्यापैकी सात इमारत मालकांनी आपले इमारत स्थिरता प्रमाणपत्र पालिकेला सादर केले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळकट्टा परिसरात घडलेल्या घटनेची जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी दखल घेताना सूचना केल्या आहेत. काल त्यांनी याबद्दल मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्याशी चर्चाही केली.

कामत यांच्या सूचना: आमदार दिगंबर कामत यांनीही काल पिंपळकट्टा परीरिसराची पाहणी करून आढावा घेतला. या परिसरात दुतर्फा पार्किंग केल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे यापुढे पिंपळकट्टा परिसर ते रेल्वे स्थानकापर्यंत केवळ एकाच बाजूने पार्किंग करून दुसरी बाजू मोकळी सोडण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT