Yogesh Nagavekar Historian Dainik Gomantak
गोवा

Margao City: शहरातील 'त्या' इमारती कोसळून लोकांचा जीव घेण्याचा सरकारचा इरादा आहे का? इतिहासकारांचा संतप्त सवाल

Margao City: प्रत्येक राष्ट्र आपला वारसा जपतो पण गोव्यात ते होताना दिसत नाहीय- नागवेकर

Ganeshprasad Gogate

Margao City: ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेली आणि 118 वर्षे जुनी असलेली मडगाव नगरपालिकेची इमारत, कोमुनिडेड इमारत, हॉस्पिसिओ इमारत तसेच मडगाव अर्बन हेल्थ सेंटर सध्या अखेरच्या घटका मोजत असून त्या अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या वारसा वास्तूंकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने त्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही हेरिटेज वास्तूंचे संरक्षण करत आहोत असे एका बाजूचे सरकार म्हणतेय पण मडगाव मधील ऐतिहासिक वास्तूंबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून आल्याचे इतिहासकार योगेश नागवेकर म्हणाले.

मडगावात आरोग्य केंद्राचा काही भाग गेल्या ऑगस्टमध्ये कोसळला होता त्याभागाचे अद्याप बांधकाम झालेले नसून सद्यस्थितीत तो अक्षरशः प्लास्टिकने झाकावा लागतोय. याशिवाय मडगाव नगरपालिकेची दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेली इमारत पावसाळ्यात प्लास्टिकने झाकावी लागली होती. सरकार सर्व हेरिटेज वास्तू दुरुस्तीबाबत वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत आहे.

प्रत्येक राष्ट्र आपला वारसा जपतो पण गोव्यात ते होताना दिसत नाहीय. हा प्रकार खूपच दुःखदायक आहे. गोवा हे जगप्रसिद्ध राज्य आहे, त्याचा वारसा, संस्कृती, वास्तुकला पाहण्यासाठी अनेक पर्यटक राज्याला भेट देतात.

मात्र ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या वारशांचे जतन करण्याकडे विद्यमान सरकार दुर्लक्ष करत असून या इमारती कोसळण्याचा आणि त्याखाली चिरडून माणसे मारण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा सवाल योगेश नागवेकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT