Vasco Accident| Goa News  Dainik Gmantak
गोवा

Accident News: मडगावच्या ‘वऱ्हाडी’ बसला कर्नाटकात अपघात

Accident News: बसमधील सर्वांनाच दुखापत झाली. झोपी गेलेल्या काहींना गंभीर जखमा झाल्या.

दैनिक गोमन्तक

Accident News: मडगावहून जांबोटी- खानापूरमार्गे कित्तूर-बैलूर येथे लग्न समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी बसला सोमवारी (ता.28) पहाटे चारच्या सुमारास ओलमणी (कर्नाटक) जवळ अपघात घडला. यात बसमधील 35 जणांपैकी 9 जण गंभीर जखमी झाले.

मडगावहून सदर खासगी बस (क्र. जी ए 07 एफ 8833) सोमवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास चोर्ला मार्गे जांबोटी- खानापूर रस्त्यावरून कित्तूर तालुक्यातील बैलूर येथे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास ओलमनी गावाजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस खाईत पलटी झाली.

त्यामुळे बसमधील सर्वांनाच दुखापत झाली. झोपी गेलेल्या काहींना गंभीर जखमा झाल्या. रुग्णवाहिकेने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 35 पैकी 9 जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची महिती खानापूर पोलिसांनी दिली आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

वृद्ध महिलांचा समावेश

बसचालक श्रीकांत खोलकर, शिवाक्का व फकीरवा अशी जखमींची नावे आहेत. याविषयी माहिती मिळाल्यानंतर मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर आणि त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

आणि त्यांना गोव्यात सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न केला. या बसमध्ये अधिक प्रमाणात वृद्ध महिलांचा समावेश होता. बसमधील अधिक प्रवासी खारेबांद येथील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT