Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: CM प्रमोद सावंत यांच्या विरोधात वक्तव्य भोवलं, रामा काणकोणकर यांना पोलिसांचे समन्स; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Marathi News: मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून रामा काणकोणकर यांची चौकशी.

Akshata Chhatre

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री सावंतांनी घेतली भेट

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट घेतली.

उत्तराखंड भाजप सरकारचा आदर्श गोवा कधी घेणार?

उत्तराखंड मंत्रिमंडळाने बुधवारी राज्याची संसाधने, सांस्कृतिक वारसा आणि तेथील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 11 जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांतील लोकांना कृषी आणि बागायती जमीन खरेदी करण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून रामा काणकोणकर यांना चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश

गोव्यातील कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना आज पणजी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. काल १९ जानेवारी रोजी त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर सांकवाळ मुद्द्यावरून वक्तव्य केले होते.

मिरची पिकावर 'चुरडा मुरडा' व्हायरसचा प्रादुर्भाव

मिरची पिकावर 'चुरडा मुरडा' (लीफ कर्ल) व्हायरसचा प्रादुर्भाव. डिचोली विभागीय कृषी अधिकाऱ्यांचा दावा. अधिकाऱ्यांनी केली मये भागातील मिरचीच्या मळ्यांची पाहणी.

सांगे येथील टाऊन हॉलचे अपूर्ण बांधकाम पडले; पालिकेने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली

टाऊन हॉल अपूर्ण पाडल्यामुळे सांगे मार्केटमध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सांगे नगरपालिकेने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली.

चोर्ला घाटात दुधाच्या टँकरला आग

झांबळीकडे, चोरला घाटाजवळ दुधाच्या टँकरला आग. वाळपई अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.

गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद मडगाव बाजारात

गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद मडगाव बाजारात आला आहे. एका मानकुराद आंब्याची किंमत ४५० रुपये आहे.

आसगावमधील सट्टेबाजीचा पर्दाफाश!

आसगावमधील सट्टेबाजीचा पर्दाफाश! १२ जणांना अटक, ८ मोबाईल जप्त

कुडचडे सीवरेज प्लांट ८ महिन्यांत सुरू होईल

सीवरेज प्लांट येत्या ८ महिन्यांत सुरू होईल. तसेच कुडचडेवासीयांना मोफत सीवरेज कनेक्शन दिले जाईल : नीलेश काब्राल, आमदार

कन्नड बांधव प्रयागराजला रवाना; आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दाखवला बावटा

कन्नड बांधव प्रयागराजला रवाना. गोव्यात वास्तव्य करणाऱ्या १२० कन्नडीगांचे बुधवारी रात्री डिचोली येथून तीन बसगाड्यांमधून महाकुंभमेळ्यासाठी प्रयाण. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दाखवला बावटा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT