Women's ODI Cricket Tournament Twitter/BCCI
गोवा

Women's ODI Cricket Tournament: गोव्याच्या महिलांना आत्मघात नडला

Women's ODI Cricket Tournament: सलग तीन विजयानंतर हरियानाविरुद्ध पराभूत

किशोर पेटकर

Women's ODI Cricket Tournament: सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामने जिंकल्यामुळे गोव्याच्या महिलांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला होता. मात्र हरियानाविरुद्ध त्यांच्या बॅट्सवूमनचा आत्मघात नडला व स्पर्धेतील पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले.

सामना बुधवारी मंगलापुरम-त्रिवेंद्रम येथील केरळ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला. नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली.

8 विकेट 23 धावांत गमावल्यामुळे गोव्याचा डाव 153 धावांत आटोपला. नंतर हरियानाने सोनिया मंधिया (38) व कर्णधार शीतल राणा (नाबाद ५२) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर ५ विकेटच्या मोबदल्यात १५७ धावा करून सामना जिंकला.

श्रेया परब (४१ धावा, ५० चेंडू, ५ चौकार) व विनवी गुरव (५९ धावा, ६९ चेंडू, ८ चौकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली ८५ धावांची भागीदारी, तसेच विनवी गुरव व कर्णधार शिखा पांडे (२७ धावा, २८ चेंडू, ४ चौकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ४५ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याचा संघ २ बाद १३० असा सुस्थितीत होता.

नंतर शिखा बाद झाल्यानंतर २३ धावांत गोव्याचा डाव अनपेक्षितपणे संपुष्टात आला. हरियानाच्या शीतल राणा (३-३०) व सोनिया मंधिया (४-१८) यांच्यासमोर गोव्याच्या बॅट्सवूमननी नांगी टाकली.

संक्षिप्त धावफलक

गोवा: ३५.४ षटकांत सर्वबाद १५३ (तेजस्विनी दुर्गड ०, श्रेया परब ४१, विनवी गुरव ५९, शिखा पांडे २७, तरन्नुम पठाण ०, सुनंदा येत्रेकर ०, पूर्वा भाईडकर १, दिव्या नाईक ९, निकिता मळीक ४, प्रियांका कौशल ०, दीक्षा गावडे नाबाद ०, शीतल राणा ३-३०, सोनिया मंधिया ४-१८) पराभूत वि. हरियाना: ३९.५ षटकांत ५ बाद १५७ (सोनिया मंधिया ३८, शीतल राणा नाबाद ५२, शिखा पांडे ६-१-२१-०, निकिता मळीक ३-१-१४-१, तरन्नुम पठाण १०-२-३४-२, पूर्वा भाईडकर ३-०-१३-०, सुनंदा येत्रेकर ९.५-१-३०-१, दीक्षा गावडे ५-०-२७-१, प्रियांका कौशल ३-०-१४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT