Women's ODI Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Women's ODI Cricket Tournament: गोव्याच्या महिलांची घोडदौड; सलग तिसरा विजय संपादन

Women's ODI Cricket Tournament: उत्तर प्रदेशवर मात, तरन्नुम-दिव्या यांची भागीदारी निर्णायक

किशोर पेटकर

Women's ODI Cricket Tournament: गोव्याने सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविताना उत्तर प्रदेशला पाच विकेट राखून हरविले.

त्रिवेंद्रम येथील सेंट झेवियर्स केरळ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदानावरील विजयात तरन्नुम पठाण व दिव्या नाईक यांची फलंदाजीतील नाबाद भागीदारी निर्णायक ठरली

गोव्याचा महिला संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना त्यांची २२ व्या षटकात ५ बाद ७८ अशी घसरगुंडी उडाली. मात्र अनुभवी तरन्नुम (नाबाद ३२) हिने दिव्याच्या (नाबाद २९) साथीत सहाव्या विकेटसाठी ६६ धावांची अभेद्य भागीदारी करून गोव्याला स्पर्धेतील तिसरा विजय मिळवून दिला.

गोव्याने ४१.३ षटकांत ५ बाद १४४ धावा केल्या. त्यापूर्वी तेजस्विनी दुर्गड (३१) हिने श्रेया परब (१९) हिच्या साथीत ३१ धावांची सलामी दिली होती.

गोव्याने नाणेफेक जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. कर्णधार शिखा पांडे व निकिता मळीक यांच्या भेदक गोलंदाजीसमोर उत्तर प्रदेशची ४.१ षटकांत ३ बाद १ धाव अशी दयनीय स्थिती झाली.

त्यानंतर शानदार अर्धशतक केलेल्या आरुषी (६१ धावा, ९८ चेंडू, ८ चौकार) हिने उत्तर प्रदेशला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. तिने चौथ्या विकेटसाठी सोनाली सिंग (२७) हिच्यासमवेत ७८ धावांची भागीदारी केल्यामुळे त्यांना १४३ धावा करणे शक्य झाले.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश: ४७.३ षटकांत सर्वबाद १४३ (सोनाली सिंग २७, आरुषी ६१, अंजली सिंग १९, शिखा पांडे ७-३-१४-२, निकिता मळीक ४-१-६-१, तरन्नुम पठाण ९-२-२०-०, सुनंदा येत्रेकर ९-२-४०-१, प्रियांका कौशल ८.३-०-२२-३, दीक्षा गावडे ४-०-१३-०, पूर्वा भाईडकर ६-०-२८-०) पराभूत वि.

गोवा: ४१.३ षटकांत ५ बाद १४४ (तेजस्विनी दुर्गड ३१, श्रेया गावडे १९, विनवी गुरव ९, पूर्वा भाईडकर ९, शिखा पांडे २, तरन्नुम पठाण नाबाद ३२, दिव्या नाईक नाबाद २९, अंशू तिवारी १-३८, अंजली सिंग ३-२४, सोनाली सिंग १-२१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT