Utpal Parrikar & babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे 31 मे पूर्वी पूर्ण होणार- मोन्सेरात

Panjim Smart City: मी इथे निवांत बसलेलो नाही. मला लोकांना होणारा त्रास माहित आहे - मोन्सेरात

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: स्मार्ट सिटी संदर्भात पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महत्वाची माहिती दिलीय.

बरेच दिवस रखडलेल्या स्मार्ट सिटीचे काम 31 मे पूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिलीय.

स्मार्ट सिटीच्या प्रत्येक दिवसाच्या कामकाजावर लक्ष ठेवले जात असून प्रत्येक कामकाजाचे व्यवस्थित नियोजन केले जात आहे.

विकासात्मक कामे लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे जातील याकडे आम्ही लक्ष देत आहोत असे मोन्सेरात यांनी सांगितलेय.

स्मार्ट सिटीच्या विषयावरून मागील काही दिवस उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती.

पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली खोदकामात चाललेली दिरंगाई ही केवळ इलेक्शन फंडिंगसाठी असल्याचा खळबळजनक आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला होता.

ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे पणजीवासीय मेटाकुटीला शहरातून प्रवास करणे मुश्किल बनले असल्याचेही पर्रीकर म्हणाले होते.

तर ''मी इथे निवांत बसलेलो नाही. मला लोकांना होणारा त्रास माहित आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.

स्मार्ट सिटीवरून माझ्यावर टीका करणाऱ्या टॉम, डिक आणि हॅरीला उत्तरे देण्यासाठी मी इथे नाही. हिंमत असेल तर त्यांनी 2027 च्या निवडणुकीत माझा सामना करावा, असे म्हणत बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांच्या आरोपाला उत्तर देताना अप्रत्यक्षरित्या आव्हानही दिले होते.

एकूणच या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांच्या कलगी तुऱ्यानंतर अखेर राजधानीत स्मार्ट सिटीची कामे 31 मे पूर्वी पूर्ण होणार असलयाचे तूर्तास तरी आश्वासन मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT