Goa Road Accident: Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सत्तरीत अपघात; हेदोडेतील युवक जागीच गतप्राण

Goa Road Accident: म्हशींना चुकवताना नेहालचा गाडीवरील ताबा सुटला.

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: सालेली, सत्तरी येथे गुरुवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास दुचाकीची रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतीला धडक बसून दुचाकीस्वार नेहाल उल्हास गावडे (23, हेदोडे सत्तरी) हा युवक जागीच ठार झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, नेहाल हा पणजी येथे पासपोर्ट कार्यालयात कामाला होता. तो संध्याकाळी मोटरसायकलवरुन (जीए 04 पी 6055) पणजीवरुन वाळपई हेदोडे येथे आपल्या घरी परतत असताना सालेली (पीएनजी) कंपनी जवळ येथे पोहचला असता रस्त्यावर म्हशींना चुकवताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

त्याची गाडीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण कुंपणाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तो जागीच गतप्राण झाला. यावेळी 108 ने त्याला वाळपई आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

नेहाल हा हेदोडे सत्तरी येथील रहिवासी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. त्याच्या जाण्याने सर्वत्र हळवळ व्यक्त केली जात आहे. मृत्यदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून उद्या शुक्रवारी बांबोळी येथे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.

यावेळी सदर घटनेचा पंचनामा वाळपई पोलिस निरिक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विष्णू जाधव पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT