Goa Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Goa Hit And Run Case: बांबोळी हायवेवर इलेक्ट्रिक कार आणि अॅक्टिव्हा स्कूटरमध्ये अपघात; वडील आणि मुलगी गंभीर जखमी

Goa Hit And Run Case: ट्यूशन संपवून वडील आणि मुलगी घरी जात असताना घडला अपघात

Ganeshprasad Gogate

Goa Hit And Run Case: बांबोळी हायवेवर शुक्रवारी रात्रौ 8.15 च्या सुमारास इलेक्ट्रिक कार आणि अॅक्टिव्हा स्कूटरमध्ये अपघात झाला असून 10.30 पर्यंत रुग्णवाहिका न पोहोचल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली होती.

या घटनेसंबंधी मिळालेली प्राथमिक माहिती अशी कि,ट्यूशन संपवून अॅक्टिव्हा स्कूटर वरून वडील आणि मुलगी घरी जात असताना बांबोळी हायवेवर एका इलेक्ट्रिक कारची त्यांच्या अॅक्टिव्हा स्कूटरला धडक बसली.

ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील ते दोघेही रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

त्यानंतर तिथून जाणाऱ्या श्रेया काणकोणकर आणि काव्या दिवकर यांनी त्या जखमींना हॉस्पिटलला नेण्याससाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला.

तसेच पोलिसांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्हीही विभागाकडून रात्रौ 10.30 पर्यंत घटनास्थळी कुणीही फिरकले नसल्याची माहिती मिळाली आहे.

अखेर श्रेया काणकोणकर आणि काव्या दिवकर यांनी जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त मुलीचे आणि वडिलांचे नाव, पत्ता, वय या संबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT