Goa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: घाडीवाडा-कारापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

Goa Fire Case: नार्वेकर कुटुंबाच्या घरातील भांडीकुंडी, फ्रिज, कपडे जळून खाक

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: घाडीवाडा-कारापूर येथे दत्तप्रसाद नार्वेकर यांच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

या घटनेसंबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी 14 जानेवारीला संध्याकाळी 5 च्या सुमारास नार्वेकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.

ही आग एवढी भीषण होती की, नार्वेकर यांच्या घरातील भांडीकुंडी, फ्रिज, कपडे आदी संसार उपयोगी सर्व साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने यावेळी घरात कुणीच नसल्याने जीवित हानी टळली.

आगीचे वृत्त समजताच घाडीवाड्यातील सर्व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली.

मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घरात घुसून स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडर घराबाहेर काढला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT