arrested Dainik Gomantak
गोवा

Goa News: पेड पार्किंग कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या चौघांना म्हापसा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

पेड पार्किंग कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या चौघांना म्हापसा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

म्हापसा येथे दोन खासगी पेड पार्किंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आरोपी कालपासून पोलिसांना गुंगारा देत होते, मात्र पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पेड पार्किंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही लोकांनी त्यांना मारहाण केली होती. आरोपी हे घटनेनंतर फरार झाले होते. म्हापसा पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला होता.

समस्त गोमंतकीय गणेशभक्तांचं कल्याण करा, राज्यपाल आर्लेकरांचं गणपती बाप्पाकडे साकडं

समस्त गोमंतकीय गणेशभक्तांचे कल्याण करा. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची मंगलमूर्ती गणरायाजवळ प्रार्थना. राज्यपाल श्री. आर्लेकर यांच्या मये येथील मूळ घरी साजरी होणार पाच दिवसांची चतुर्थी.

जर्मनीतील गोमंतकीयांनी बोटीवर साजरा केला गणेशोत्सव

दरवर्षी जर्मनीमध्ये गोव्यातील लोक त्यांचा आवडता गणेशोत्सव AIDALuna बोटीवर साजरा करतात.

पोर्तुगीजकालीन वालशे पुल दुसऱ्यांदा पाण्याखाली

सांगे मतदारसंघातील पोर्तुगीज कालीन वालशे पुल गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला.

Goa Crime: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद

म्हार्दोळ पोलीसानी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध केला गुन्हा नोंद.

Goa Rain: 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!

यंदाच्या मान्सून हंगामात 1 जून ते 28 ऑगस्टच्या सकाळी 8.30 पर्यंत राज्यात 109.22 इंच पावसाची नोंद. बुधवार आणि गुरुवारच्या 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस. आतापर्यंत धारबांदोड्यात सर्वाधिक 143.53 इंच पाऊस.

Goa Rain: भर चतुर्थीत पावसाचा तडाखा

भर चतुर्थीत पावसाचा तडाखा. नार्वे येथे घरावर कोसळली संरक्षक भिंत. अनर्थ टळला. मर्मवाडा येथील ज्येष्ठ महिला सुखरूप.

Bicholim: डिचोलीत पुरसदृश्य स्थिती

डिचोलीत पुरसदृश्य स्थिती. मुसळधार पावसामुळे बंदरवाडा रस्ता पाण्याखाली. रिव्हर फ्रंट प्रकल्पातही घुसले पाणी. विविध ठिकाणी पडझड.

Rivona Death: रिवणमधील दोन भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रिवण येथील दोन भाऊ, राजेंद्र गावकर (४६) आणि मोहनदास गावकर (४०) यांचा काल रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आपल्या गुरांसाठी गवत कापण्यासाठी ते जंगलात गेले असता ही घटना घडली.

गावणे- बांदोडा रस्त्यावर कोसळले आंब्याचे झाड, वाहनांचे नुकसान

गावणे- बांदोडा येथे रस्त्यावर कोसळले मोठे आंब्याचे झाड. पार्क केलेल्या काही वाहनाचे नुकसान. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.

Goa Rain: दूधसागर नदीची पातळी वाढली, रस्ते पाण्याखाली

मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. दावकोण व निरंकाल येथील रस्ते पाण्याखाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT