सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा नीता कांदोळकर यांनी राजीनामा दिला आहे.
काही शॅक सबलेट असल्याचे आढळून आले, म्हणून सरकारने त्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. यापैकी सुमारे २३ गोव्यातील लोकांच्या मालकीच्या होत्या आणि त्या इतर गोव्यातील लोकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना देण्यात आल्या.
शॅक मालक संघटना आणि स्थानिक आमदारांनी सरकारला पुनर्विचार करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर, आम्ही या २३ गोव्यातील शॅकना पुन्हा एकदा संधी देण्याचा आणि त्यांना नूतनीकरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे: रोहन खवंटे, पर्यटन मंत्री
कोने- प्रियोळ येथे धावत्या स्कुटरला आग. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली. चालक सुखरूप. फोंडाहून कुंडई येथे जात असताना मागाहून स्कुटर मधून धूर आला. एका वाहन चालकाने स्कुटर चालकाला माहिती दिली. स्कुटर रस्त्यावर थांबविल्यानंतर आग लागली. आगीत स्कुटर पूर्णपणे जळून खाक.
म्हादई बचाव अभियानाच्या सदस्यांनी आज मला भेटून त्यांच्या सूचना कळवल्या. आम्ही या सूचनांचा आढावा घेऊ आणि त्यावर महाधिवक्ता आणि अधिवक्ता यांच्याशी चर्चा करू: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजीपासून चिंबेल उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूचे काम ७५% पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाचे काम ४-५ आठवड्यांत पूर्ण होऊन वाहनांसाठी खुले केले जाईल
ऑन ड्युटी नसलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने कुत्र्याला आणि एका तरुणाला मारल्याच्या व्हायरल व्हिडिओवर पशुसंवर्धन मंत्री नीलकंठ हालरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले; "अशा प्रकरणांमध्ये पशुसंवर्धन विभाग कारवाई करू शकत नाही, कारण पोलिसच त्यांना हाताळतात"
जेटी येथील एफसीए मैदानावर उभी केलेली मोटारसायकल व त्यातील आयफोन १४ प्लस चोरीस गेल्याची तक्रार बायणा येथील रामस्वामी मदार यांनी मुरगाव पोलिसांत केली आहे. त्यांची किंमत जवळपास दोन लाखांच्या घरात आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मांद्रे मतदारसंघातील डोंगर-माळरान भागात बिगर गोमंतकीयांकडून बेकायदेशीर डोंगरकापणी व झाडांची कत्तल करून पर्यावरणाची हानी करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रमेश मयेकर यांनी केला आहे. सरकार व पर्यावरण खात्याने या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. पंचायत मंडळे व स्थानिकांनी तक्रारी करूनही वन खात्याने केवळ दिखाऊ पाहणी केल्याचा आरोप त्यांनी केला. बिगरगोमंतकीयांकडून व्हिलांचे बांधकामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याविरोधात काँग्रेसने यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आमोणे येथील श्री पूर्वस बेताळ देवाचा चार दिवसीय डाळपोत्सव अर्थात सुखवास उत्सवाचा प्रारंभ शनिवारी झाला. देवाचा अवसर कौल हा मुख्य उत्सव मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता प्रतिवर्षाप्रमाणे होईल. संपूर्ण गोवा तसेच परिसरात प्रसिद्ध असलेल्या या कौलाच्या उत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचा कौल घेतात. यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेले आहे.
झुआरीनगर येथील पारव्दीप फॉस्फेट्सच्या अंतर्गत रस्त्यावर कारची धडक बसल्याने नुवे येथील सेसिलिया अब्रांचीस ही महिला दुचाकीचालक जखमी झाली.याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी शुभम गावडे याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
राज्य हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. परंतु, रविवारी मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. तरीही हवामान विभागाने सोमवारचा ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.