arrested Dainik Gomantak
गोवा

Goa News: श्रवण बर्वे खून प्रकरण; आरोपींना 9 दिवसांची पोलिस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी

Akshata Chhatre

Shravan Barve Murder Update: श्रवण बर्वे खून प्रकरण; आरोपींना 9दिवसांची पोलिस कोठडी

श्रवण बर्वे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या देविदास बर्वे (वडील) आणि उदय बर्वे (भाऊ) यांना न्यायालयाने ९ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ponda News: कुर्टी - खांडेपार सरपंचपदी निळकंठ नाईक

कुर्टी - खांडेपार सरपंचपदी निळकंठ नाईक तर उपसरपंचपदी परवीन बानो तहसीलदार यांची ६ विरुद्ध ५ मतांनी निवङ

Dona Paula Crime Update: दोना पावला दरोडा प्रकरण; पणजी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी नागली हिल्स, दोना पावला येथील घरात घुसून दागिने आणि रोख रक्कम लुटली. या संदर्भात, पणजी पोलीस ठाण्यात कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि आरोपींना लवकरात लवकर शोधण्यासाठी गोवा पोलिसांच्या अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Pramod Sawant Goa: सरकारी योजना आणि अर्थसंकल्पीय अंमलबजावणीची आढावा बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आणि अर्थसंकल्पीय अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि सचिवांसोबत बैठक झाली. सुव्यवस्थित अंमलबजावणी करण्यावर चर्चा झाली; मुख्यमंत्री सावंत

Dona Paula Crime Update: दोना पावला घटनेचा तपास सुरु

Goa Crime Update: दोना पावला बंगल्यावर पोलीस दाखल

सध्या गोवा पोलिसांकडून क्राईम ब्रांचचे डीजीपी आलोक कुमार, राहुल गुप्ता आणि डीआयजी वर्षा शर्मा दोना पावला येथील घटना घडलेल्या बंगल्यावर पोहोचलेत. रविवारी मध्यरात्री या बंगल्यात मध्यरात्रीच्यावेळी खंजीर घेऊन तीन दरोडेखोर घरात घुसले होते. पैकी एकाने वृद्ध धेम्पो जोडप्याला बांधले आणि इतरांनी चोरी करत तिथून पळ काढला.

Yuri Alemao: दोना पावला येथील तिघांनी घर लुटले; पोलिसांची गस्त कुचकामी: युरी

दरोडेखोरांनी आता सुरक्षा रक्षक आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या घरांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे हे पाहून धक्का बसतो. गोव्यात कोणीही सुरक्षित नाही कारण दरोडेखोरांनी पोलिस यंत्रणेवर ताबा मिळवला आहे, जी कार्यक्षम नाही आणि पोलिसांची गस्त कुचकामी आहे : युरी आलेमाव

फोंडा येथील मेगा मार्टवर छापा; उंदीर सापडल्याने खळबळ

फोंडा येथील एका मेगा मार्टवर अन्न व प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्याचा छापा. किराणा सामान आहे त्याठिकाणी मार्ट मध्ये उंदीर मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने काही किराणा मालचे पॅकेट्स तपासणीसाठी अधिकाऱ्यानी घेतले ताब्यात.

Goa News: अबकारी चेक नाक्यावर गार्ड म्हणून कार्यरत असलेले मयूर प्रकाश गोकर्णीकर यांचे दुःखद निधन

पत्रादेवी येथील अबकारी चेक नाक्यावर गार्ड म्हणून कार्यरत असलेले मयूर प्रकाश गोकर्णीकर (वय ४७, मडगाव) यांचे दुःखद निधन. ड्युटीवर असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान त्यांचे शनिवारी रात्री निधन झाले.

Goa Crime: दोना पावला येथे तिघांनी लुटले घर

रविवारी (दि.२०) रात्री दोना पावला येथील एका घरात खंजीर घेऊन तीन जण घुसले. त्यांनी प्रथम गार्डवर हल्ला केला, नंतर घरात घुसून जयप्रकाश धेंम्पो (७७) आणि त्यांची पत्नी पद्मिनी (७१) यांना त्यांच्या बेडवर बांधले. मौल्यवान वस्तू चोरल्यानंतर ते पळून गेले. पोलिस तपास सुरू आहे.

Goa Culture: 'रेड्या'ची जत्रा साजरी..!

मये येथील प्रसिद्ध 'रेड्या'च्या जत्रेत परंपरा खंडीत. माशेलमधील तरंगांचा जत्रेत सहभाग नाही. तरीसुद्धा मयेवासियांनी साजरी केली जत्रा. 'माले'ही पेटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT