Bank Robbery  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुंगुल हल्ला प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News : जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, क्रीडा, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

मुंगुल हल्ला प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक

मुंगुल हल्ला प्रकरणात प्रकाश हेल्माला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचा भाऊ, जो स्वतः आरोपी आहे, तो अजूनही फरार आहे. दरम्यान, मुख्य संशयितांपैकी एक, अमोघ नाईक याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालय 16 सप्टेंबर रोजी त्याच्या जामिन अर्जावर युक्तिवाद ऐकणार आहे.

ईडीने हणजूण येथील प्रमुख व्यावसायिकाच्या निवासस्थानी टाकला छापा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोवा पोलिसांसह आज हणजूण येथील भूमिका मंदिराजवळील एका प्रमुख व्यावसायिकाच्या निवासस्थानी छापा टाकला.

"उगाच IITला विरोध करू नका" मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की राज्यातील प्रस्तावित आयआयटी कॅम्पससह प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची काही लोकांनी सवय लावली आहे. त्यांनी गोव्यातील लोकांना संस्थेचे स्वागत करण्याचे आवाहन केले कारण यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्यांचे भविष्य घडेल.

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटच्या प्रस्तावाला कुंकळ्ळी नगरपालिकेच्या सर्व १४ सदस्यांनी एकमताने नकार दिला आहे. नगरपालिकेच्या या निर्णयाचे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मनापासून स्वागत केले आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले मतदान

नवी दिल्ली येथे झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय मंत्री आणि सहकारी खासदारांसह मतदान केले.

संजीवनी साखर कारखान्यात आग 

संजीवनी साखर कारखान्यातील ट्रॅक्टरच्या वेल्डिंगचे काम सुरु असताना लागली आहे.फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. स्थानिकांनी वारंवार आवाहन करूनही, अधिकारी परिसरात प्रभावी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात अपयशी ठरले आहेत.

महाराष्ट्रातील मुंब्रा येथे इमारत कोसळून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे रस्त्यावरून चालत असताना इमारतीचा काही भाग त्यांच्यावर कोसळून ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या सुनेला गंभीर दुखापत झाली.

महादेव आरोंदेकर पंचायत संचालकपदी

महादेव आरोंदेकर यांची पंचायत संचालकपदी बदली. सिद्धी हळर्णकर नागरी विमानोड्डाण खात्याच्या संचालकपदी. राजेश आजगावकर कामगार आयुक्त

रेडेघाटीत गुरे मध्ये आल्याने भाजी वाहू वाहनाचा ताबा सुटून अपघात

रेडेघाटीत गुरे मध्ये आल्याने भाजी वाहू वाहनाचा ताबा सुटून अपघात, सुदैवाने जीवित हानी टळली. सदर वाहन चालक विजेंद्र बोहत (म्हापसा) सुखरूप. मंगळवारचा बाजारासाठी येत असताना अपघात.

Goa Rain: पुढील आठवडाभरात तुरळक पाऊस

राज्यात मागील आठवड्यापासून पावसाचा जोर मंदावला आहे. पुढील आठवड्यात अतिशय तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील २४ तासांत ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. राज्‍यात आत्तापर्यंत २९४१.३ मि.मी. म्हणजेच ११५.७९ इंच पाऊस पडला असून, सरासरीच्‍या तुलनेत तो ५ टक्के अधिक आहे. आज सोमवारी सकाळी राज्याच्‍या अनेक भागात पावसाच्‍या सरी कोसळल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: डबल ट्रेकिंग विरोधात 'आप'ची व्यापक मोहीम, सडा येथून सुरवात, जागृती करणार

Numerology: 'या' मूलांकाच्या व्यक्तींना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता; 'कोणाला यश, कोणाला निराशा'?

Gemini Nano Banana: 'नॅनो बनाना'ची सर्वांनाच भुरळ; मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनीही शेअर केले PHOTO

National Tribal Convention: मडगावात राष्ट्रीय आदिवासी अधिवेशन, 12 व 13 रोजी आयोजन; तीन हजार प्रतिनिधी होणार सहभागी

Goa Live News: कळंगुट आणि कांदोळीमध्ये कमी दर्जाच्या काजूच्या विक्रीवर देखरेख मोहीम

SCROLL FOR NEXT