goa marathi breaking news Dainik Gomantak
गोवा

Goa News: "आमच्या आमदारांना कोणीही फोन केला नाही"

Goa marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

"आमच्या आमदारांना कोणीही फोन केला नाही"

“आमच्या आमदारांना कोणीही फोन केला नाही, तो एक खाजगी कार्यक्रम होता”: फातोर्डा मेळाव्याबद्दल आपचे अमित पालेकर

पारंपरिक पद्धतीने शेतीची मळणी

मरडी वाडा मोरर्जी येथील रोशन रविकांत शेटगावकर व रविकांत शेटगावकर हे पारंपरिक पद्धतीने शेतीची मळणी कापणी व भात वारेही पारंपारिक पद्धतीने करतात

दिवाळीच्या निमित्ताने नारळ फोडणे स्पर्धा

मरडी वाडा मोरची येथील श्री कल्चरल क्लब मार्फत मोरजी मर्यादित दिवाळीच्या निमित्ताने नारळ फोडणे स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन मोरर्जेचे सरपंच विलास मोरर्जी माजी उपसरपंच आणि श्री दाडोबा देवस्थानचे अध्यक्ष अमित शेटगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणही त्याच दिवशी करण्यात आले

Accident: चिंचणी अपघात प्रकरणातील कारचालकावर गुन्हा

चिंचणी येथील अपघातप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा नोंद केला आहे. स्वाती मयेकर (३८) असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना २३ सप्टेंबरला घडली होती. भरधाव वेगाने कार चालवून चालकाने एका बुलेट दुचाकीला धडक दिली होती. त्‍यात बुलेट चालक क्लिफ्टन डिसोझा (४४) हा जखमी झाला होता.

कारने धडक दिल्याने एका ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

फोंडा येथील सिल्वा नगर येथे रस्त्याने चालत असताना कारने धडक दिल्याने एका ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

माशे येथे नरकासुर स्पर्धा गोंधळात, दोघांना अटक; नंतर जामीन मंजूर

काणकोण येथील माशेम येथे नरकासुर स्पर्धेदरम्यान जोरदार वाद झाला, ज्यामुळे लोलीये येथील रोनी फर्नांडिस आणि पैंगिण येथील राजेंद्र चारी या दोन सहभागींना ताब्यात घेण्यात आले. नरकासुर मिरवणुकीच्या मार्गावर जाण्यावरून झालेल्या वादातून ही हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही व्यक्तींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले.

धावे सत्तरीत मारुती मंदिरात श्रीकृष्ण पूजन उत्साहात, नागरिकांकडून परंपरा कायम

नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे सत्तरी येथील मारूती मंदिरात दिवाळीच्या आदल्या दिवशी काल रविवारी रात्री श्रीकृष्ण पूजन करून एक आदर्श निर्माण केला आहे. एरव्ही राज्यभर आदल्या दिवशी श्रीकृष्णा ऐवजी नरकासूराचा उदोउदो केला जातो. पण धावे येथील ब्राम्हणवाडीतील नागरिकांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुजन केले. मंदिराचे पुजारी तथा पत्रकार पद्माकर केळकर यांनी पुजा केली. तर पुरोहित श्रीधर भावे यांनी पूजा सांगितली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पुरोहीत श्रीधर भावे म्हणाले अनिष्ठ गोष्टींना फाटा देण्याची गरज असून धावें वासियांनी ठेवलेला आदर्श हा स्त्ुत्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सुरु ठेवली आहे असे भावे म्हणाले. यावेळी आरती म्हणून सर्वांना गुळपोहे प्रसाद म्हणून वितरीत करण्यात आले.

समेस्त गोंयेकरांक, दिवाळीची परबी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT