Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: उसगांव मारहाण प्रकरण, 'त्या' दोघा हिस्ट्रीशिटरांना बेड्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 3 July 2025: गोव्यातील राजकारण,क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

उसगांव मारहाण प्रकरण, 'त्या' दोघा हिस्ट्रीशिटरांना बेड्या

उसगाव येथील संदेश गावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी हिस्ट्री शिटरा अमोघ नाईक (३९, बोरी), सचिन कुर्टीकर (३५, तिस्क -उसगाव) व विशांत अमोणकर (३४, बोरी) यांना फोंडा पोलिसांनी केली अटक.

गोव्यातील नेपाळींबाबत तो मोठा आरोप आणि आता 'गोवा नेपाळी टीव्ही'?

लवकरच होऊ घातलेल्या पणजी म्हानगरपालिकेच्या मतदार यादीत नेपाळ्यांची नावे घुसविण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी उत्पल पर्रीकरांनी केला होता. आता 'गोवा नेपाळी टीव्ही' ही सोशल मिडीयावर सक्रीय असल्याची बाब समोर. गोव्यातील नेपाळी समुदायाच्या बातम्या ह्याद्वारे होत आहेत प्रसारीत

कळंगुटमधील एका स्पामध्ये लागली भीषण आग

कळंगुटमधील एका स्पामध्ये भीषण आग लागली, ज्यामुळे संपूर्ण परिसर जळून खाक झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गोव्यात ऑरेंज अलर्ट!

भारतीय हवामान खात्याने गोव्यात ३ जुलै २०२५ आणि ४ जुलै २०२५ रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

महिलांसाठी कामाची वेळ निश्चित!

गोवा दुकाने आणि आस्थापना कायदा, १९७३ नुसार महिला कामगारांसाठी कामाचा कालावधी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत निश्चित. महिला कामगारांना सुरक्षित वाहतूक देण्यासह कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्याही संबंधितांना सूचना. कामगार खात्याकडून अधिसूचना जारी.

प्रशासकीय समितीला ६ महिन्यांची मुदतवाढ

गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन मंडळाच्या प्रशासकीय समितीला अाणखी ६ महिन्यांनी मुदतवाढ. मंडळाची निवडणूक न झाल्याने कृषी खात्याने घेतला निर्णय

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे राम मंदिरासमोरील चिंबेल येथील मानसवाडा येथे एक भिंत कोसळली.कोणतीही जीवितहानी झाली नाही

'जनता दरबार'ला प्रतिसाद..!

'आमचो आवाज विजय' या गोवा फॉरवर्डच्या 'जनता दरबार'ला डिचोलीत सुरवात. आमदार विजय सरदेसाई यांच्यासमोर जनतेने मांडल्या समस्या

हरमल-भटवाडी येथील संपूर्ण रस्ता पाण्याखाली

हरमल-भटवाडी येथील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करून कंपाऊंड उभारल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास मार्ग बंद. त्यामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक घटनास्थळी दाखल

कमी वजनाचे एलपीजी सिलिंडर विकणाऱ्या गॅस एजन्सींवर मोठी कारवाई

कमी वजनाचे एलपीजी सिलिंडर विकणाऱ्या गॅस एजन्सींवर मोठी कारवाई करताना, नागरी पुरवठा संचालनालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा सांकवाळ येथे छापा टाकून १,००० हून अधिक सिलिंडर जप्त केले. कमी वजनाचे सिलिंडर विकल्याबद्दल कादेश गॅस सर्व्हिसेस आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध वेर्णा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महिलेला 'ऑनलाईन' गंडा..!

'टाटा स्काय रिचार्ज पॅक'च्या नावाखाली अज्ञात व्यक्तीकडून महिलेची फसवणूक. बँक खात्यातून 44 हजार 340 रुपये परस्पर हडप. अनुशा वाडकर हिची डिचोली पोलिसात फसवणुकीची तक्रार. गुन्हा नोंद करून डिचोली पोलिसांकडून तपास सुरु.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT