गोवा

Goa News: कळंगुट येथे पोलिसांकडून वॉटरस्पोर्ट्सच्या कागदपत्रांची अचानक तपासणी

Goa Marathi News 19 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

कळंगुट येथे पोलिसांकडून वॉटरस्पोर्ट्सच्या कागदपत्रांची अचानक तपासणी

सर्व काही सुरळीत आणि सुरक्षितपणे चालू आहे याची खात्री करण्यासाठी कळंगुट येथे पोलिसांनी वॉटरस्पोर्ट्सच्या कागदपत्रांची अचानक तपासणी केली.

दया पागी सामना निरीक्षक म्हणून नियुक्त

28 जानेवारी 25 रोजी राजकोट येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या T20 साठी BCCI सामना निरीक्षक म्हणून नियुक्त केल्याबद्दल दया पागीचे अभिनंदन

Calangute: कळंगुट पंचायतीच्या कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

कळंगुट येथील नूतनीकरण केलेल्या पंचायत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आज मोस्ट रेव्हरंड ऍलेक्स डायस, रेव्हरंड फादर पॉली लोबे, बीडीओ बार्डेज प्रथमेश ए. शंकरदास, सरपंच जोसेफ आर. सेक्विरा आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा (२०२३-२४) देखील सत्कार करण्यात आला.

गोव्यात मराठी व कोकणीला समान दर्जा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाषेच्या आधारे राज्यनिर्मिती झाली होती. गोव्यात कोकणी भाषा राजभाषा असली तरी मराठीला गोव्यात दुय्यम दर्जा कधीच मिळाला नाही. दोन्ही भाषांना समान दर्जा आहे. भावी पिढी निर्मितीच्या दृष्टीने सर्व साहित्यिकांनी एकत्रित येऊन कोकणी व मराठीतील साहित्यिक निर्माण करावे - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खनिज विषय तापला

मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खनिज विषय तापला. गावाच्या अस्तित्वाचा विचार होत नाही, तर खाण नकोच. ग्रामसभेत ठराव.

बेकायदा पराग्लायडीग प्रकरण; शेखर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल

केरी पठारावरून बेकायदा पराग्लायडीग करताना एक पर्यटक युवती व पायलट यांचा मृत्यू होण्याची घटना घडली, मांद्रे पोलिसांनी शेखर नामक व्यक्तीवर जी बेकायदेशीर व्यवसाय करत होता त्याच्यावर गुन्हा नोदवला,शिवाय पर्यटक अधिकारी उपस्थित असतानाही बेकायदा परागलायडीग सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

गोवा आजही जपतोय सांस्कृतिक वारसा

आजही आदिवासी संगठना केपे आदिवासी उत्सव प्रदर्शन आणि लोकनृत्यांमधून आपला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो.

विर्डी साखळीचा पारंपरिक कालोत्सव उत्साहात

विर्डी साखळी येथील श्री देव महादेवाचा पारंपरिक कालोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराच्या मंडपात दशावतारी नाट्यपथकातर्फे परंपरेप्रमाणे कालोत्सवात सादर करण्यात येणारा "शंकासूर वध" हा भाग सादर करण्यात आला. हा भाग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

पणजीतील पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये 1.31 लाख रुपयांची अफरातफर

पणजीत पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये १.३१ लाख रुपयांची अफरातफर. रिशेप्शन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard Attack: शिगावात रात्री बिबट्याची दहशत, कुत्र्यांचा पाडला फडशा; वनअधिकाऱ्यांनी केली पाहणी

Goa Education: कितीही विषय अनुतीर्ण, विद्यार्थ्यांना 5 व्या सत्रात मिळणार प्रवेश; गोवा विद्यापीठाचे परिपत्रक

Goa Assembly Live: मोबाईल सोडा, कोलवाळ तुरुंगात टाटा स्कायही सापडला!

Dhirio Goa: बंदी असूनही सोशल मीडियावर 'धीरयो'ची खुलेआम जाहिरात! उच्च न्यायालयाकडून दखल; कारवाईचे निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; डिचोलीत भाजपला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT