Water Problum | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Water Problem: अपुऱ्या पाणीपुरवठ्या मुळे हणजूणवासीय त्रस्त!

Goa Water Problem: कायसूव पंचसदस्यांनी घेतली म्हापशात साबांखाच्या कनिष्ठ अभियंत्यांची भेट

दैनिक गोमन्तक

Goa Water Problem: हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा संदर्भातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत आहे. मागील दोन महिन्यांपासून गावात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असून स्थानिकांचे पाण्याविना हाल होत आहे. याविषयी शुक्रवारी स्थानिक पंचसदस्यांच्या शिष्टमंडळाने म्हापशातील साबांखाच्या पाणीपुरवठा विभागाला भेट दिली.

उपसरपंच अ‍ॅग्नेस कार्व्होलो, पंच सुरेंद्र गोवेकर, दिनेश पाटील, सुदेश पार्सेकर व माजी पंचसदस्य संदेश खोर्जुवेकर यांनी कनिष्ठ अभियंते तनय कांदोळकर यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. व्हॉल्व्हशी छेडछाड होत असल्याने हे पाणी इतरत्र वळविले जाते, हे या पाणी टंचाईमागील प्रमुख कारण असल्याचा दावाही या पंचसदस्यांनी यावेळी केला.

हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील झरवाडा, शापोरा, वागातोर, टिटो व ग्रॅण्ड पेडे या भागांत पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

10 डिसेंबरनंतर पाणी!

तिळारी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामामुळे या कालव्यातील पाणी बंद केले आहे. अस्नोडा प्रकल्पातून पुरेशी पाण्याची जलशुद्धी होत नाही. बार्देश तालुक्यातील जलकुंभात योग्य क्षमतेचे पाणी पडत नसल्याने ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या कालव्यातील पाणी 10 डिसेंबरनंतर पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT