Mapusa Municipal | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हापशातील ‘त्या’ नगरसेवकांची शिर्डी सहल बनली चर्चेचा विषय!

Goa News: मुख्याधिकाऱ्यांवर आरोप : चौकशी करण्याचे सोडून मौजमजा

दैनिक गोमन्तक

Goa News: येथील पालिका बाजारातील सोपो कंत्राटदाराकडून कथित लाच मागितल्याची तक्रार पालिकेतील चार नगरसेवकांविरुद्ध पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केल्यानंतर चौकशीचा मुख्याधिकारी पत्ता न लावताच चक्क तो आरोप असलेल्याच नगरसेवकांसोबत शिर्डी येथे सहलीला गेल्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला.

मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याकडे पालिका बाजारातील सोपो कंत्राटदार शिरोडकर यांनी पालिका बाजार समितीचे अध्यक्ष नगरसेवक विराज फडके, नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर, स्वप्नील शिरोडकर यांच्याविरुद्ध कथित लाच मागत असल्याचा दावा करीत तक्रार केली होती. याची मुख्याधिकाऱ्‍यांनी दखल न घेता सत्ताधारी गटाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे या प्रकारातून बोलले जात आहे.

नगरसेवकांत संताप

सोपो कंत्राटदाराकडून लाच मागितल्याचा कथित आरोप असलेल्या नगरसेवकांसोबत मुख्याधिकारी शिरवईकर सहलीला गेल्यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्‍यांमध्ये चर्चा चालू आहे. तक्रारीची दखल घेण्याचे सोडून कथित आरोप असलेल्या नगरसेवकांसोबत मौजमजा करण्यासाठी ते गेल्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT