Sanjay Barde |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Sanjay Barde Statement on Pravin Arlekar: आमदार प्रवीण आर्लेकरांवर पाण्‍याच्या चोरीचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Barde: अपात्रता याचिका दाखल करणार

दैनिक गोमन्तक

Sanjay Barde Statement on Pravin Arlekar: मीटरविनाच घरात पाण्याचे कनेक्शन घेतल्याचा आरोप करीत काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्‍यावर निशाणा साधला. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशीची मागणी करीत आर्लेकरांविरोधात आपण अपात्रता याचिका दाखल करणार असल्याचे बर्डे यांनी आज येथे सांगितले. काँग्रेस कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदला सीतेश मोरे हेही उपस्‍थित होते.

आर्लेकर यांचे धारगळ येथे घर आहे आणि याच घराचा पत्ता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिलेला आहे. या घरास पाण्याचा मीटर नसताना तिथे जोडणी घेतली गेली आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोग तसेच संबंधितांकडे लेखी तक्रार करून आर्लेकरांविरोधात अपात्रता याचिका दाखल करणार असल्याचे बर्डे म्‍हणाले.

दोन दिवसांपूर्वी याप्रश्‍‍नी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्‍यानंतर ताबडतोब काल रविवारी नळजोडणी परस्पर कापण्यात आली. याचाच अर्थ हा बेकायदा प्रकार असून गेली अनेक वर्षे पाण्याची चोरी करण्‍यात आलेली आहे, असा आरोप बर्डे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT