Goa News | Mapusa Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: आता शहरातही भाजीचे मळे

Goa Agriculture: बार्देश कृषी कार्यालयाचा उपक्रम : रहिवाशांना देणार प्रशिक्षण

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: बार्देश विभागीय कृषी कार्यालयाने आता तालुक्यात भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत आता शहरी रहिवाशांनाही त्यांच्या घरालगतच्या जागेत, परसात भाजीपाला पिकवण्यास प्रवृत्त केले जात आहे. शहरी रहिवाशांसाठी लवकरच तीन दिवसांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

विभागीय कृषी कार्यालयात आता रब्बी हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगाम जवळपास संपत आला असून, सध्या तालुक्यात कापणी सुरू आहे. विभागीय कृषी कार्यालय आणि शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.

बियाण्यांची विक्री आधीच सुरू झाली आहे. कारण, शेतकरी विभागीय कृषी कार्यालयाकडून अनुदानित दराने बियाणे खरेदी करतात. यात कारले, पालक, वांगी, कलिंगड, मुळा, शेपू, मेथी, भेंडी, काकडी, मका यांचा समावेश आहे.

बियाण्यांच्या विक्रीबरोबरच, बार्देश विभागीय कृषी कार्यालयाने विविध भाजीपाल्यांची रोपे वाढवण्यासाठी बेड तयार केले आहेत. जे शेतकर्‍यांना पुरविले जातील. धुळेरमधील शेतकऱ्यांमार्फत भाजीपाल्यांची रोपे वाढवण्यास सुरुवात केली आहे.

रोपांसाठीही अनुदान

संपत्ती धारगळकर म्हणाल्या की, आमचे कर्मचारी रोपांचे बेड वाढवण्याची तयारी करत आहेत. पुढील 20-25 दिवसांत मिरचीची रोपे तयार होतील. वांगी, ब्रोकोली या व्यतिरिक्त शतावरी, नवलकोल ही रोपेही तयार केली जातील. ती शेतकऱ्यांना अनुदानाने दिली जातील. सध्या विविध बियाण्यांचीही विक्री सुरू असून त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

धुळेर येथे प्रात्यक्षिके

धारगळकर पुढे म्हणाल्या की, ज्या शहरी रहिवाशांकडे थोड्या फार प्रमाणात जागा आहे, परसबाग आहे, त्यांच्यासाठी विभागीय कार्यालय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. अगदी कुंडीतही भाजी पिकवता येते.

सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा, याचे प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाईल. धुळेर फार्म येथे 22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी शहरवासीयांनी नोंदणी करण्याचे आवाहन कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT