Goa News | Municipal Employees Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांची काळी पट्टी बांधत मूक निदर्शने!

Goa News: 'चार्टड ऑफ डिमांड' करारपत्र नूतनीकरण करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: म्हापसा येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 10 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस यापूर्वीच पालिकेला दिली आहे. मात्र, पालिका मंडळ ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी कालपासून दंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. ही मूकनिदर्शने 9 ऑक्टोबरपर्यंत दुपारी जेवणाच्या सुट्टीत केली जातील.

पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिका मंडळाला जूनमध्‍ये 19 कलमी मागणीपत्र (चार्टड ऑफ डिमांड) सादर करून ते पूर्ण करण्याची केली होती. कर्मचारी संघटना व नगरपालिका यांच्‍यातील चार्टड ऑफ डिमांड करारपत्राची मुदत सप्टेंबर 2021मध्ये संपुष्टात आली आहे. या करारपपत्राचे नूतनीकरण करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

परंतु अजून त्‍याची पूर्तता न झाल्‍यामुळे अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने म्‍हापसा पालिकेला बेमुदत संपाची नोटीस दिली आहे. या नोटिशीची प्रत पालिका संचालनालय, मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, उपसभापती, मुख्य सचिव, पालिका खात्याचे सचिव, कामगार आयुक्त व कामगार खात्याच्या सचिवांना पाठवली आहे. पण पालिका तसेच कामगार आयुक्तांसह वरील एकाही खात्याकडून संघटनेच्या या नोटिशीला उत्तर मिळालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी; न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT