Goa Utsav Dainik Gomantak
गोवा

Goa Utsav: म्हापशात श्रीहनुमानाचे सीमोल्लंघन उत्साहात!

Goa Utsav: खोर्लीतील व्यापारी असलेले स्व. विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी या लालखीचे दरवर्षी आगमन होते.

दैनिक गोमन्तक

Goa Utsav: विजयादशमी दिवशी म्हापसा शहरात महारुद्र संस्थानतर्फे श्री हनुमंताची लालखी नगरप्रदक्षिणेस निघाली. विशेष म्हणजे, ही लालखी खोर्ली-सीम ओलांडून खोर्ली भागात प्रवेश करते. तत्कालिन खोर्लीतील व्यापारी असलेले स्व. विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी या लालखीचे दरवर्षी आगमन होते.

यंदाही खोर्लीवासीय नागरिक श्रींच्या स्वागतास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री हनुमानानाचे भाविकांसह सीमोल्लंघन झाले. लालखी स्व. सावंतांच्या घरी आल्यावर पूजाअर्चा झाली. आरतीनंतर, जवळच उत्सवासाठी लावलेल्या आपट्यांच्या झाडाचे पूजन करण्यात आले व त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला.

तसेच, यावेळी हाती लागलेली हे सोने नंतर लोकांनी आपल्या मित्रमंडळीला देऊन एकमेकांस दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. लालखीचे रात्री 1च्या सुमारास महारुद्र मंदिरात पुनरागमन झाले. नंतर आरती व तीर्थप्रसाद वितरणानंतर या उत्सवाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT