Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: पर्यटक लूट प्रकरणातील शिल्पाला जामीन नामंजूर!

Goa Court: पर्यटकांना पार्लरमध्ये नेऊन त्यांना लुटणाऱ्या टोळीतील संशयित शिल्पा हिला म्हापसा न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन नाकारला.

दैनिक गोमन्तक

Goa Court: कोल्हापूर येथील काही पर्यटकांना म्हापसा येथील स्वादिष्ट जेवण देणारे हॉटेल दाखविण्याच्या बहाण्याने पार्लरमध्ये नेऊन त्यांना लुटणाऱ्या टोळीमधील संशयित शिल्पा थापा हिला म्हापसा न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन नाकारला.

दरम्यान, या टोळीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच त्यातील संशयित अजून फरारी आहेत. जामीन दिला तर संशयित गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निरीक्षण करत न्यायालयाने हा निर्णय दिला.

म्हापसा येथे मसाज पार्लर असलेल्या संशयितांनी कोल्हापूरच्या पर्यटकांना हॉटेलऐवजी पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारहाण केली होती. खंडणी वसूल करताना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल मिळून सुमारे 1 लाख 80 हजारांचा ऐवज हिसकावून घेतला होता.

तसेच, या प्रकरणी तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हे पर्यटक गोव्यात पोलिसांत तक्रार न करता निघून गेले होते. कोल्‍हापूरला गेल्यावर झालेल्या घटनेची माहिती तेथील पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणाची गोवा पोलिसांकडून चौकशी सुरू झाली. म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिन भारद्वाज, मुबारक मुल्ला, आशिष सिंग व इतर तीन महिलांनी कटकारस्थान करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक केली होती.

त्यानंतर या गुन्ह्यात गुंतलेल्या जानकी कडगा, संगीता लामा व शिल्पा थापा या तिघांनाही अटक झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शिल्पा थापा हिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT