Goa Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भला मोठा दगड घालून एटीएमची केली मोडतोड

Goa Crime: हळदोणे येथे चोरीचा प्रयत्न फसला

दैनिक गोमन्तक

Goa Crime: एसबीआय बँकेचे हळदोणे येथील एटीएम दगड घालून फोडण्याचा प्रयत्न अज्ञात युवकाने केला. मात्र, त्यातून तो पैसे काढू शकला नाही. परंतु युवकाच्या या कारनाम्यामुळे एटीएम व कक्षाचे मिळून बँकेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. बँक व्यवस्थापक ए. दिवाकर राव यांच्या तक्रारीनुसार, म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या एटीएममध्ये गेलेल्या ग्राहकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने हा प्रकार बँक कर्मचाऱ्यांच्या कानी घातला. एटीएम मशीन आणि त्याच्या स्क्रिनवर भला मोठा दगड घालण्यात आला होता.

युवकाचा कारनामा कॅमेऱ्यात कैद :

एटीएम कक्षामध्ये एक युवक शिरतो. एटीएमवर भला मोठा दगड घालतो आणि त्याची मोडतोड करतो, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. दगड घालूनही मशीन न उघडल्यामुळे त्या युवकाला पैशांची चोरी करता आली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT