Accident (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी सत्तरीत टँकरने ठोकरल्याने इसमाचा मृत्यू

टँकर ड्रायव्हरवर गुन्हा दाखल पोलिसांनी ताब्यात घेतले (Goa)

दशरथ मोरजकर

केरी - सत्त्तरी (Keri - Sattari) येथे दोन बाजार परिसरात (2 Market Area) आज संध्याकाळी एका टँकरने येथे असलेल्या एका पादचारी इसमाला ठोकरल्याने (The tanker hit the man) त्या इसमाचा मृत्यू झाला (Man Dead). मयत इसमाचे नाव सुब्रमण्यम मुत्तू गवंडर (वय 50) असे आहे. आज संध्याकाळी पाच सुमारास ही घटना घडली. दरम्यान येथील बाजार परिसरातील मुख्य रस्त्यावर बेळगाव दिशेने जाण्याऱ्या टँकरने( KA 25 AA 9924) येथे असलेल्या पादचारी इसमाला समोरून धक्का दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Sanqalim Health Center) दाखल करून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोमॅकॉत (Goa Medical Collage) नेत असताना त्याचा मृत्यू झाला. (Goa)

दरम्यान वाळपई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून टँकर ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच ड्रायव्हरला ताब्यात घेतले असल्याने पोलिसांनी सांगितले आहे. मयत इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमॅकॉत पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वाळपई पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सर्वेश घाडी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय गावस करीत आहेत.

दरम्यान मयत इसम हा केरीतील अंजुणे धरण भागातील तामीळ वस्तीतील आहे. त्याच्या पाश्चात्य त्याचा एक वीस वर्षीय (कार्तिक) मुलगा आहे. सदर इसमाचा मृत्यू झाल्याने त्याचा मुलगा कार्तिक हा एकटा पडला आहे. त्याच्या आईचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वी झाला होता. दरम्यान केरीतून अवघड वाहनांची वाहतूक बंद असताना हा ट्रक या मार्गावरून आल्याने या अपघाताला कारणीभूत ठरला आणि त्यात एकाला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे या भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT