Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ट्रॉलर ऑपरेटरच्या खूनप्रकरणी इस्राएलचा जामीन पुन्हा नामंजूर

Malim jetty Murder Case: या गुन्ह्यात पोलिसांच्या नजरेत एकूण पाचजण संशयित

गोमन्तक डिजिटल टीम

मालीम जेटी येथील ट्रॉलरवरील ऑपरेटर अंकुश किरवे याच्या खूनप्रकरणी संशयित इस्राएल सोययमुरून याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला लाड यांनी दुसऱ्यांदा फेटाळला. यापूर्वी फेटाळण्यात आलेल्या अर्जावेळी उपस्थित केलेले मुद्दे व आताच्या अर्जामध्ये मांडलेले मुद्दे यामध्ये काहीच बदल दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.

या खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्यासह पाचजणांना संशयित केले आहे. अंकुश याला मारहाण करण्यात तसेच त्याला नदीत फेकण्यामध्ये संशयित इस्राएल याचा काहीच संबंध नाही.

साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात संशयिताला अटक करून या गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची नाही. तपासकामात त्याने पोलिसांना सहकार्य केले आहे. त्याला अटी घालून जामीन मिळाला तर त्याचे पालन केले जाईल, असा युक्तिवाद संशयिताच्या वकिलांनी केला होता.

खलाशी अंकुश किरवे याला ट्रॉलरवरीलच काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केली तेव्हा संशयितही तेथे होता हे साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT