Tirupati Balaji Temple Goa Dainik Gomantak
गोवा

Tirupati Balaji Temple Goa: गोव्यातील भाविकांची तिरुपतीची वारी; मात्र कटकटीच भारी!

Tirupati Balaji Temple Goa: बालाजी मंदिरात दर्शन तर दूरच भाविकांना पावसाच्या माऱ्याने रात्रभर कुडकुडत काढावी लागली.

दैनिक गोमन्तक

Tirupati Balaji Temple Goa: ‘फुकटचे खाणे पोट फुगविणारे’ असे म्हणतात. याचा प्रत्यय नुकत्याच सरकार पुरस्कृत तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या गोव्यातील भाविकांना आला. बालाजी मंदिरात पोहोचल्यावर तिथे दर्शनाची सोय करण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्याने वयोवृध्द भाविकांना अर्धी रात्र रांगेत उभे राहून काढावी लागली. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने रांगेतील भाविक चिंब भिजले. ती रात्र त्यांना अक्षरश: कुडकुडत काढावी लागली.

या यात्रेला गेलेल्या काही भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे 400 भाविक खास गाडीने मडगावहून तिरुपतीला रवाना झाले. शुक्रवारी दुपारी 3 वाजता ते तिरुपती स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांना हॉटेलवर नेण्यात आले. त्यांच्या बालाजी दर्शनाची सोय कशी केली आहे, याची माहिती स्थानिक आयोजकांनाही नव्हती.

त्यांना सायंकाळी 7 वाजता बालाजी मंदिरात नेण्यात आले. पण मंदिर परिसरात त्यांची सोय पाहण्यासाठी कोणीच नव्हते. त्यामुळे भाविकांची गोची झाली. त्यांना तिथे पोहोचल्यावर तुमची दर्शनाची सोय करण्यासाठी येथे कुणीही नाही. हवे तर तुम्ही पैसे भरून दर्शन घ्या, असे सांगण्यात आल्याने सर्व भाविक रांगेत उभे राहिले.

आमच्यासाठी ही यात्रा म्हणजे भयानक असा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया या पथकातील एका 65 वर्षीय भाविकाने व्यक्त केली. आमच्या गटातील अर्धे लोक वेटिंग रूममध्ये आणि अर्धे बाहेर होते. आम्ही सगळेच भांबावून गेलो होतो.

त्या रात्री काहीजणांना रात्रीचे जेवणही मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. या साऱ्या गडबडीत बराच वेळ गेल्याने शेवटी या भाविकांना पद्मावती देवीचे दर्शन न घेताच गोव्यात यावे लागले. रात्री उशिरा ते सर्वजण गोव्यात पोहोचले.

अन्‌ वृद्ध भाविक भांबावले

पाऊस सुरू झाल्याने रांगेत उभे राहिलेले भाविक चिंब भिजले. अशातच दर्शनाची वेळ संपल्याने काहीजणांना दुसऱ्या दिवशी पहाटे दर्शन घ्यावे लागले. अर्ध्या भाविकांना बाहेरच ठेवल्याने त्यांना भिजलेल्या अवस्थेत रात्री उशिरा दर्शन न घेता हॉटेलवर परतावे लागले. जे वेटिंग रूममध्ये होते, तेही चिंब भिजले होते. त्यांनी ती रात्र कुडकुडत काढत दुसऱ्या दिवशी पहाटे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT