Goa Made Liquor Seized in Patan, Satara Dainik Gomantak
गोवा

दुधाच्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी, कराड - चिपळूण मार्गावर 19.75 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pramod Yadav

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या मद्याची महाराष्ट्रात होणाऱ्या तस्करी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पथकाने कराड-चिपळूण मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले आहे.

मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळूण (Karad-Chiplun Road) मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत गोवा बनावटीचे (Goa Made Liquor Seized) विदेशी मद्य जप्त केले आहे. मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

याप्रकरणी गोरखनाथ बाबुराव पवार (रा.बेलवडे खुर्द ता.पाटण), प्रदीप कृष्णात सलते (रा.मु.सलते पो. बीबी ता.पाटण) व दिनेश दगडू कदम (रा.वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिर) यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(इ), 81, 83, 90, 103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करायचे.

या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सकस दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र आवघडे यांनी सहभागी होते.

जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारु, तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहनही श्रीमती शेडगे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT