Goa Lokotsav  Dainik Gomantak
गोवा

Goa Lokotsav: दर्या संगमावर लोकोत्सवाची जय्यत तयारी सुरु

कला व संस्कृती संचालनालय व पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकोत्सव 2023 या कार्यक्रमाचे उद्‍घाटन 30 जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Lokotsav: कला व संस्कृती संचालनालय व पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकोत्सव 2023 या कार्यक्रमाचे उद्‍घाटन राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 30 जानेवारी रोजी संध्या. 6.30 वाजता होणार आहे.

हा महोत्सव ८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते कला अकादमी परिसरात दर्या संगमावर सुरू असलेली लोकोत्सवाचे नियोजन, उभारण्यात येत असलेले मंच व विविध स्टॉल यांची पाहणी करण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संचालक सगुण वेळीप तसेच इतर अधिकारीवर्ग उपस्थित होते. गावडे म्हणाले, लोकोत्सवाला राज्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असतो. त्यासोबतच गेली दोन वर्षे लोकोत्सव कोरोना महामारीमुळे करता आला नसल्याने अधिक कलाकार तसेच नागरिक सहभाग घेण्याची शक्यता आहे.

यंदा लोकोत्सवासाठी जो भव्य मंच उभारला आहे, त्याची कलाकुसर वेगळी आहे. पूर्वी राज्यातील एक दोन मंडळांना सादरीकरणासाठी आमंत्रित करत होतो परंतु यंदा 16 गटांना सहभागी करून घेतले आहे.सुमारे बाराशेहून अधिक कलाकारांचे लोकोत्सवादरम्यान सादरीकरण होईल ज्यात गोमंतकीय कलाकारांसोबतच इतर राज्यातील कलाकारांचा देखील समावेश आहे.

22 राज्यांतील कलाकारांचा सहभाग

लोकोत्सवात 22 राज्यातील कलाकार सहभागी होणार असून अंदाजे 620 स्टॉल या लोकोत्सवात असणार आहेत. ज्यातील सर्वाधिक स्टॉल्स हे गोमंतकीय कलाकारांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी पुरविले जातील, यात हस्तकला, शिल्पकला, खाद्यपदार्थ, आदी विविध कलाकारांचा यात सहभाग असणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी येथे येऊन त्यांची उत्पादने खरेदी करावी जेणेकरून कलाकारांना आर्थिक मदत होईल असे आवाहन मंत्री गावडे यांनी केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT