Goa Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha: 'दक्षिण गोव्याचा उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर होणार'; गोव्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Loksabha: उत्तर गोव्यासाठी भाजपकडून श्रीपाद नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले

Ganeshprasad Gogate

Goa Loksabha: लोकभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चिती करण्यात गुंतले असून उत्तर गोव्यासाठी भाजपकडून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर आणि दिलीप परुळेकर यांची नावे पाठवण्यात आली होती.

यापैकी श्रीपाद नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, यासंबंधीची अधिकृत घोषणा बाकी आहे.

तर, दक्षिण गोव्यासाठी माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती रमेश तवडकर, बाबू कवळेकर आणि दामू नाईक यांची नावे पाठविण्यात आली होती.

यापैकी कामत आणि तवडकरांनी माघार घेतल्याने इतर तिघांची नावे चर्चेत असल्याचे समजतेय.

काही दिवसांपासून दिल्ली दरबारी हजर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नुकतेच गोव्यात दाखल झाले असून दक्षिण गोव्याचा उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

एक उमेदवार निश्चित झाला आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर अजून चर्चा सुरू असून लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा दिल्लीतून होईल.

दुसऱ्या उमेदवाराचे नांव दुसऱ्या यादीत जाहीर होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून गोव्यात दाखल झाल्यानंतर दिली आहे.

मागील दोन दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण गोव्यात लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार? याबाबत दिल्लीत बैठका सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT