Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: लोकसभेची रणधुमाळी! उमेदवारी निश्‍चितीकरणाच्या विलंबामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Lok Sabha Election: श्रीपाद, सार्दिन, खलप, सावईकर, कामत ‘गॅस’वर

Ganeshprasad Gogate

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांमध्येच लढत होणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत, परंतु भाजप व इंडिया आघाडीकडून उमेदवार निश्‍चित होण्यास अजूनही विलंब होत आहे.

त्यामुळे इच्छुक असलेले विद्यमान खासदार श्रीपाद नाईक, फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह नरेंद्र सावईकर, दिगंबर कामत, ॲड. रमाकांत खलप आणि बाबू कवळेकर यांच्यासारख्या मातब्बरांना झुलवत ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे हे इच्छुक उमेदवार सध्या गॅसवर असून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेने मनातल्या मनात ‘मांडे’ खाऊ लागले आहेत असे तरी सध्याचे चित्र आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे मागील वर्षांपासून वाहू लागले, भाजपचे नेते आमचा उमेदवार ठरला म्हणून जाहीरपणे सांगत होते. त्यात श्रीपाद भाऊ यांनीही स्वतःची निवडणूक लढवण्याची इच्छा काही दडवून ठेवलेली नाही.

त्यामुळेच मध्यंतरी उत्तरेतील उमेदवारीसाठी दिलीप परुळेकर आणि दयानंद सोपटे यांनी ‘खडा’ टाकून पाहिला होता. अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना तो ‘खडा’ विरघळण्यापूर्वी बाजूला करावा लागला.

दक्षिणेतून भाजपचे नरेंद्र सावईकर हे उमेदवार मानले जात असले तरी बाबू कवळेकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, तर दिल्लीला जाण्यास इच्छुक नसणाऱ्या दिगंबर कामत यांनाही पक्षाने ‘गॅस'वर ठेवले आहे.

भाजप कार्यकर्त्यांना हवा नवा चेहरा:-

काही महिन्यांपर्यंत श्रीपाद नाईक यांचे नाव आघाडीवर होते, परंतु जसजसे पक्षाचे नेते मत व्यक्त करीत आहेत, तसतसे भाऊंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

पक्षातील एक मोठा गट भाऊंच्या उमेदवारीला विरोध करणारा आहे. नवा चेहरा द्यावा, अशी अपेक्षा अनेकांची आहे. केंद्र सरकारात मंत्री राहिल्यानंतर भाऊंकडून अनेक क्षेत्रात काम करण्यास वाव होता, पण तो काही दिसलाच नाही, असे पक्षाचे कार्यकर्तेच सांगतात.

खलपांची अस्वस्थता वाढली:-
काँग्रेसचे ॲड. रमाकांत खलप हे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, परंतु त्यात विजय भिके आणि राजन घाटे यांनीही दावा करायला सुरवात केली आहे, त्यामुळे खलपांची अस्वस्थता वाढली आहे.

दक्षिणेत अल्पसंख्याक उमेदवारासाठी प्रयत्न:-

जशी श्रीपाद भाऊंची उत्तेरत स्थिती आहे, तशीच काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचीही दक्षिण गोव्यात स्थिती आहे. त्याठिकाणी नवा उमेदवार अल्पसंख्याकच देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे.

त्यासाठी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांच्या गटाने पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय अल्पसंख्याक उमेदवार पक्ष देणार असेल तर आपण माघार घेऊ असे इच्छुक उमेदवार व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे सार्दिन यांनाही आपली उमेदवारी नक्की मानता येईना अशी स्थिती तेथे आहे.

कोटकाँग्रेसच्यावतीने येत्या चार-पाच दिवसांत पक्षाचे उमेदवार जाहीर होतील, अशी आम्हाला आशा आहे. आम आदमी पक्षाबरोबरची बोलणी सकारात्मक झाली असल्याने दोन्ही पक्षाच्या युतीविषयी आणि उमेदवाराविषयी लवकरच संयुक्तपणे माहिती जाहीर केली जाईल.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT