Goa Lok Sabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha: भाजप-काँग्रेस समर्थकांचे लक्ष दिल्लीकडे, उत्कंठा उमेदवार घोषणेची

Goa Lok Sabha: सध्या दोन्ही पक्षांकडून रणनीती ठरविली जात आहे. बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Lok Sabha: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या, त्यात भाजपकडून दक्षिण गोव्याच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

परंतु दक्षिण गोवा उमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या पल्लवी धेंपे यांनी दिल्लीत जाऊन भाजप सदस्यत्व स्वीकारल्याने त्यांच्या नावाच्‍या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे.

त्यातच काँग्रेसचेही दोन्ही जागांवरील उमेदवार जाहीर न झाल्याने राजकीय पक्षांबरोबर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत.

भाजपची दक्षिण गोव्याची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना अखेर शनिवारी सायंकाळी घडलेल्या घडामोडीमुळे पल्लवी धेंपे यांचे नाव निश्‍चित झाले असून, ते जाहीर होण्याची वाट गोव्यातील भाजप समर्थकही पाहत आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसचेही आत्तापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची नावे घोषित न झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे समर्थक दिल्लीकडे डोळे ठेवून आहेत.

आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर होताच कामाला लागावे लागणार आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून रणनीती ठरविली जात आहे. बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसच्या नावाची घोषणा होत नाही, तोपर्यंत आम आदमी पक्षाला संयुक्तपणे प्रचारात सहभागी होता येत नाही.

श्रीपाद नाईक यांच्या भेटीगाठी सुरू:-

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने गोव्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस नाव घोषित करण्यात कोणतीच घाई करताना दिसत नाही.

भाजपने उत्तर गोव्यातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली असून श्रीपाद नाईक यांनी भेटीगाठींना सुरुवात केली आहे.

दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार म्हणून पल्लवी धेंपे यांचे नाव निश्‍चित होणार असल्याची भविष्यवाणी गोमन्तकने वर्तविली होती, ती आता सत्य होण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीतून घोषणा होताच, राज्यातील भाजप नेत्यांची आणि दक्षिणेतील आमदारांची जबाबदारी वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT