Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: 'इंडिया'चे उमेदवार लवकरच जाहीर होणार..

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election: काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या वतीने इंडिया आघाडीचे उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत काही दिवसांत चित्र स्पष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती 'आप'चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिली.

दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचा खासदार कार्यरत असून, ती जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला आहे; तर उत्तर गोव्यातील जागेवरही काँग्रेसने दावा केला आहे.

चार दिवसांपूर्वी 'आप'च्या नेत्याने दिल्लीतून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी व्हेन्झी व्हिएगस यांचे नाव जाहीर केले आणि राज्यात खळबळ उडाली.

'आप' हा इंडियाआघाडीचा सदस्य घटक असल्याने गोव्यात दोन्ही पक्षांच्या संमतीने उमेदवार ठरविणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. त्यामुळे यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि 'आप'चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांना नाकीनऊ आले.

अखेर गुरुवारी सायंकाळी गोव्यात इंडिया आघाडीचा उमेदवार ठरविण्यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पाटकर-पालेकर यांना बोलावून घेण्याचे ठरले होते.

त्यानुसार हे नेते नुकतेच मुंबईत बैठकीला हजर राहून आले. मुंबईतील बैठकीत दोघांनाही आघाडीच्या उमेदवारीविषयी दोन-तीन दिवसांत म्हणजेच पुढील आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, असे आश्वासन दिल्याचे पालेकर यांनी सांगितले.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समज

मुंबईतील बैठकीत आघाडीबाबत सर्वांगीण चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी समन्वय राखून काम करावे, उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बोलू नये, आघाडीच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, असे सांगितले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT