Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आज 150 कोरोना रूग्णांची नोंद, सक्रिय रूग्णसंख्या 737

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मंगळवारी (दि.26) दिवसभरात 150 नव्या कोरोना बाधित रूग्णांची (New Covid cases) नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची (Active Cases) संख्या वाढली असून, ती 737 एवढी झाली आहे. आज 82 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. तर, एकही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची (No Covid Death) झालेली नाही.

गोवा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी दोन लाख 46 हजार 922 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.14 टक्के (Recovery Rate) एवढा आहे. सध्याच्या घडीला गोव्यात 150 जण होम क्वारंटाईन आहेत. गोव्यात कोरोनामुळे 3 हजार 949 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात देखील कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 47 हजार 512 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत 36 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरणात (Corona Vaccination) भारत आघाडीवर असून, देशाने दोनशे कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्या देशात मोफत बूस्टर डोस (Booster Dose) दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT