Goa University LLB entrance exam scam Dainik Gomantak
गोवा

Goa University : एलएलबी प्रवेश घाेळ; चौकशीसाठी समिती नेमली

खंडपीठ : आज उत्तर देण्याचे सरकारला निर्देश

दैनिक गोमन्तक

LLB entrance exam : बीए एलएलबीच्‍या पाच वर्षांच्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेत कारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्‍वा यांनी घोळ केल्‍याचे प्रथमदर्शनी दिसून आल्‍यामुळे या सर्व घोळाची चौकशी करण्‍यासाठी गोवा विद्यापीठाने कार्यकारी मंडळाच्‍या सदस्‍य आणि डीन डॉ. सविता केरकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.

या समितीत काही महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील काही विभाग प्रमुख यांचा समावेश केला आहे.

विद्यापीठाचे साहाय्‍यक कुल सचिव डॉनाल्‍ड रॉड्रिग्स यांना या समितीचे सदस्‍य सचिव म्‍हणून नियुक्‍त केले आहे. ही समिती, ही प्रवेश प्रक्रिया का बदलली आणि ती कशासाठी बदलली, याची सखोल चौकशी करणार आहे.

दरम्‍यान, आपल्‍या मुलासाठी विद्यार्थ्यांच्‍या भविष्‍याशी खेळणाऱ्या या प्राचार्याला निलंबित करा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे, तर ही चौकशी त्‍वरित केली जावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘एनएसयुआय’ या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेने केली आहे.

मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, ही चौकशी समिती नेमल्‍यानंतर कारे महाविद्यालयाचे प्राचार्य दा सिल्‍वा यांनी रजेवर जाणे पसंद केले आहे. हे महाविद्यालय चालविणाऱ्या विद्या विकास मंडळ या संस्‍थेनेही याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

आपल्या मुलाला बीए एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा, यासाठी संपूर्ण प्रवेश पद्धतीच बदलून अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांना ताबडतोब निलंबित करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.

‘एनएसयुआय’चे राज्याध्यक्ष नौशाद चौधरी यांनी प्राचार्य दा सिल्वा यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गोवा शिक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर कुठल्याही शिक्षकाचा आप्त जर परीक्षा देत असेल तर त्या शिक्षकाने स्वतःला परीक्षा प्रक्रियेपासून दूर ठेवले पाहिजे.

सोमवारी चौधरी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एस. नाडकर्णी यांची भेट घेऊन त्यांना याविषयी जाब विचारला होता.

दै. ‘गोमन्तक’ने या प्रकरणाची पोलखोल करण्याची मोहीम हाती घेतली असून तिचे शिक्षण क्षेत्राशी संबंधितांनी स्वागत केले आहे.

दुर्गादास कामत यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत केलेल्या ‘ट्विट’मध्ये, कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या या कृतीची चौकशी व्हायला पाहिजे असे म्हणत, ही चौकशी होईपर्यंत या प्राचार्याला या पदापासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी जे कृत्य केले आहे, ते विद्यार्थ्यांच्या भल्याचे नव्हे. त्‍यासाठी त्‍यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी केली.

या प्रकरणात डॉ. सिल्वा यांनी आपला पुत्र परीक्षा देत असताना त्या परीक्षेचे पेपर स्वतःच्या महाविद्यालयातील शिक्षकाकडून तयार करून घेतले. एवढेच नव्हे, तर ते तपासलेही त्यांनीच. हा थेट कायद्याचा भंग असून अशा व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाचा एका आठवड्यात सोक्षमोक्ष लागला नाही तर आम्ही पुढील कृती करू.

- नौशाद चौधरी, ‘एनएसयुआय’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT