Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa News Updates: पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणारा व्हिल्सन अखेर अटकेत; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Updates: गोव्यातील ताज्या घडामोडी...

Manish Jadhav

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणारा व्हिल्सन अखेर अटकेत!

वेर्णा येथे पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करुन नंतर लंडनला गेलेला संशयित आरोपी व्हिल्सन डिकॉस्ता (वय वर्ष 46) याला आज (3 नोव्हेंबर) मोपा विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशन पोलिसांनी अटक केली.

माजी क्रिकेटपटू आशिष नेहराचे एनडीझेड भागात अनधिकृत रस्ते बांधकाम; पंचायतीने बजावली नोटीस

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराने केळशी येथे एनडीझेडमध्ये रस्ता बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. पंचायतीने या प्रकरणाबाबत सीआरझेडला पत्र पाठवले असून नेहराला यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे.

डिचोलीत बसस्थानकाजवळ अपघात; दुचाकीस्वार तरुण थोडक्यात बचावला

डिचोलीत बसस्थाननकाजवळ दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तरुण थोडक्यात बचावला. किरकोळ जखम सोडल्यास दुचाकीस्वार तरुण सुदैवाने सुखरुप. रविवारी दुपारी अपघात घडला.

चोरीच्या गुन्ह्यात आणखी एका संशयिताला कळंगुटमधून अटक

टुरिस्ट पोलिस युनिटचे पीआय जतीन पोतुदार यांनी कळंगुट येथून आरिफुल सैदुल मोंडल नावाच्या एका संशयिताला ताब्यात दिले. चौकशीदरम्यान आरिफुल हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. कळंगुटमधील अनेक चोरीच्या घटनांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. ASI कृष्णा गुरव आणि BNSS च्या 84 च्या टीमने आरिफुलला अटक केली.

धक्कादायक! गोव्यात शिकणाऱ्या मध्य प्रदेशच्या तरुणीने गळफास घेवून संपवले जीवन

फोंडा फर्मागुडी येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिव्या विजयकुमार खती (19, मध्यप्रदेश) या विध्यार्थीने गर्ल्स हॉस्टेल मधील खोलीत गळफास घेवून जीवन संपवले. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात. फोंडा पोलिंसाकडून तपास सुरु आहे.

'पवा' उत्सवाचा जल्लोष..! गोव्यासह महाराष्ट्रातील धनगर बांधवाचा सहभाग

धनगर बांधवांचा सामूहीक 'पवा' उत्सव डिचोलीत दिमाखात साजरा. गोव्यासह महाराष्ट्रातील धनगर बांधवांचा सहभाग. शनिवारी रात्रभर घडला गजानृत्य आदी लोकनृत्यांचा आविष्कार.

अखेर तोडगा निघाला! दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सचे साखळी उपोषण मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सच्या मागण्यावर तोडगा काढला. काल (2 नोव्हेंबर) सुरु केलेले साखळी उपोषण रितसर घेतले मागे. मोठ्या प्रमाणात कुळे येथे पर्यटक पोहोचले.

कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला पंच सदस्यांची दांडी

कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला अल्प प्रतिसाद. चार पंचसदस्यांची दांडी. रविवारी झालेल्या ग्रामसभेत भाडेकरु आदी विविध विषयांवर झाली चर्चा. एका तासात आटोपली ग्रामसभा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT