Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa News Updates: पणजीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Live Updates: जाणून घ्या गोव्यातल्या ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

पणजी बेती फेरी धक्क्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. व्यक्तीचे वय 40 ते 45 असण्याची शक्यता. पोलिस पुढील तपास करीत आहे.

वाघाचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले; पर्यावरण तज्ञ राजेंद्र आर्लेकरांची प्रतिक्रिया

राज्यातील वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत पण सरकार याबाबत अनभिज्ञ. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गोव्याला दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास देखील सरकार अपयशी ठरले. वन खात्याने जारी केलेल्या पत्रका संदर्भात पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र आर्लेकर यांनी आज (29 ऑक्टोबर) 'गोमन्तक टी. व्ही'ला प्रतिक्रिया दिली.

गर्जा गोवा! नागालँडचा 83 धावांनी उडवला धुव्वा; गोलंदाजांनी दाखवली कमाल

पणजी जिमखाना येथे झालेल्या रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात गोव्याने नागालँडचा 83 धावांनी पराभव केला. गोव्याचा हा सलग तिसरा विजय आहे. गोव्याच्या या विजयात दर्शन मिसाळ 5 आणि राहुल मेहताने प्रत्येकी 4 बळी घेतले.

एफडीएची कारवाई! केळीवर विषारी रसायनाची फवारणी करताना बेळगावच्या व्यापाऱ्याला रंगेहाथ पडकलं

म्हापसा बाजारात बेळगाव येथील असिफुलहा हजरतअली कार्गुतली नावाच्या व्यापाऱ्याला केळीवर विषारी रसायन इथापोन फवारणी करताना रंगेहाथ पकडले. संबंधित केळीचे नमुने जप्त केले असून, सुमारे 9 क्विंटल माल केला नष्ट करण्यात आल्याचे एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांनी सांगितले.

कार्लुस फेरेरा यांच्या नावाने अज्ञाताने बनवले बनावट फेसबुक अकाऊंट

आमदार कार्लुस अल्वारेस फेरेरा यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. ज्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांनी आता गोमंतकीयांना आवाहन केलं की, या अकाऊंटवर कोणीही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका. ते माझे अकऊंट नाहीये. तसेच, त्या फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारु नका.

इफ्फीची जय्यत तयारी सुरु; सिद्धेश देसाई यांची माहिती

International Film Festival ची तयारी जोरात चालू आहे. यावर्षी आम्ही पर्यावरण पूरक IFFI करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम 17 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणार अशी माहिती: सिद्धेश विनायक देसाई यांनी दिली.

शिक्षक नोकरी घोटाळ्यातील सह-आरोपी सुनीता पावसकरला सशर्त जामीन मंजूर

शिक्षक नोकरी घोटाळा प्रकरणातील सह-आरोपी सुनीता शशिकांत पावसकर (56, तिवरे-फोंडा) हिला सोमवारी (28 ऑक्टोबर) रोजी अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर तिला फोंडा JMFC ने सशर्त जामिनावर मुक्त केले आहे.

मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्र दौऱ्यावर! अक्कलकोटमध्ये घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सचिन कल्याणशेट्टी यांच्याबरोबर अक्कलकोटला पोहोचले. यावेळी त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

जीटीडीसीने गोव्यातील प्रमुख व्यवसाय संपवले : सुदीप ताम्हणकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी दूधसागर जीप टूर ऑपरेटर्सची भेट घेतली आणि त्यांना GTDC सह पर्यटन सुरु करण्यास सांगितले. तसेच, कोणतीही अडचण आल्यास महिन्याभरात जीटीडीसी काउंटर बंद करेल असे आश्वासनही दिले. यावर सुदीप ताम्हणकर म्हणाले की, ''जीटीडीसी आणि गोवा टुरिझमने गोव्यातील प्रमुख व्यवसाय संपवले. आमदार गणेश गावकर आणि मुख्यमंत्र्यांनी स्थानिक समस्या समजून घेवून त्या सोडवाव्यात.''

अखेर 'त्या' मांजरीची तीन दिवसांनी सुटका!

गेल्या तीन दिवसांपासून बोर्डे-डिचोली येथे उंच झाडावर अडकलेल्या मांजरीची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका.

पणजीत सर्वाधिक 70.0 मि.मी. पावसाची नोंद!

राज्यात गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक मि.मी. पावसाचा नोंद झालीये. म्हापसा 16.2 मि.मी., पेडणे 17.4 मि.मी., फोंडा 2.8 मि.मी., जुने गोवा 49.4 मि.मी., साखळी 33.6 मि.मी., वाळपई 1.1 मि.मी., काणकोण 19.2 मि.मी., दाबोळी 1.0 मि.मी., मडगाव 0.8 मि.मी., मुरगाव 22.4 मि.मी., केपे 0.0 मि.मी., सांगे 5.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

कळंगुटमधील निकृष्ट काजू पुरवठ्यावर एफडीएची कारवाई

सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने कळंगुट परिसरातून ३,००० किलोग्रॅम निकृष्ट दर्जाचे काजू जप्त केले. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली राजाराम पाटील, लेनिन डी सा, माधव कवळेकर, साफिया खान आणि विश्वास राणे यांच्यासह वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी आणि FDA संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT