Today's Goa Live News 27 Feb 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा विश्वात दिवसभर घडलेल्या घटनांचा आढावा

Goa Breaking News 27 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज..

Kavya Powar

लोकसभेसाठी उत्तरेतून दोन आणि दक्षिण गोव्यातून काँग्रेसची तीन नावे दिल्लीत

गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगाने घडमोडी घडत आहेत. नुकतेच भाजपकडून उत्तर गोव्यासाठी चार उमेदवारांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसने देखील उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, नावे दिल्लीत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कारापूर-सर्वण सरपंच दत्तप्रसाद खारकांडे विरोधात अविश्वास ठराव

कारापूर-सर्वण सरपंच दत्तप्रसाद खारकांडे विरोधात अविश्वास ठराव. अकरापैकी सात पंचसदस्यांनी केलीय अविश्वास ठरावावर स्वाक्षरी ठराव गटविकास कार्यालयात सादर

स्पीड गवर्नर नसलेल्या रेंट कॅब जप्त करुन त्यांचे परवाने रद्द करा -माविन गुदिन्हो

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १२ ब्लॅक स्पॉट्सचे काम हाती घ्या. स्पीड गवर्नर नसलेल्या रेंट कॅब जप्त करुन त्यांचे परवाने रद्द करा. राज्यातील ९० जागांवर एआय कॅमेरे बसवा, असे निर्देश वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कारापूर सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांच्यावर अविश्वास ठराव

कारापूकर सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. 11 पैकी सात पंचायत सदस्यांनी हा ठराव दाखल केला आहे.

दरम्यान, ही पंचायत भाजप कडेच असून, अविश्वास ठराव देखील भाजपच्या पंचांनीच दाखल केला आहे.

बार्देश आणि डिचोलीत मर्यादित पाणीपुरवठा

28 आणि 29 फेब्रुवारी रोजी अस्नोडा पाणी शुद्धी प्रकल्पाच्या दुरूस्ती कामामुळे बार्देश तालुका आणि डिचोलीतील मेणकुरे व शिरगाव गावांना मर्यादित पाणी पुरवठा होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले आहे

अडणे-बाळ्ळीत भरदिवसा घरफोडी

कूपवाडा - अडणे, बाळ्ळी येथे भरदिवसा एक घर फोडून चोरट्यांनी 1.20 लाखाच्या रोकडीसह सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

उद्यापासून 12 वी बोर्डची परीक्षा सुरू; 17 हजार 987 विद्यार्थी

राज्यभरात उद्यापासून 12 वी बोर्डची परीक्षा सुरू होत असून एकूण 20 परिक्षा केंद्रामधून 17 हजार 987 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. यावर्षी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या जास्त असून 8550 विद्यार्थी आणि 9437 विद्यार्थीनी परीक्षा देणार आहेत.

कोळसा प्रदूषणाच्या विरोधात सर्व नगरसेवकांनी एकजूट व्हावे - संकल्प आमोणकर

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एमपीए अध्यक्षांची भेट घेणार.

शुक्रवारी होणाऱ्या एमपीएच्या बैठकीला प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग 9 मधील नगरसेवकांनी उपस्थित रहावे. कोळसा प्रदुषणाच्या विरोधात मुरगाव मतदारसंघातील सर्व नगरसेवकांनी एकजूट व्हावे.

सांगे येथे पाईकदेव देवस्थानची वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात

सांगे येथे पाईकदेव देवस्थानची वार्षिक जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांनी पाईकदेवांचा आशीर्वाद घेतला घेऊन महाप्रसादाचा लाभही घेतला.

नवीन मंदिर उभारणीच्या कामामुळे पाईकदेव देवाची मूर्ती मंदिराच्या बाजूला छोट्याशा घरात ठेवली आहे. ही जत्रा 5 दिवसांची असल्याने उर्वरित ४ दिवस देवस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दाबोळी विमानतळाचा खून करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न - विजय सरदेसाई

दाबोळी विमानतळाचा खून करण्याचा गोवा सरकार प्रयत्न करत असल्याचा गोवा फोतोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप. वापरकर्ता विकास शुल्काच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते.

पण त्यांनी आश्वासन पाळले नाही. यामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम होणार आहे. शुल्क कमी करण्यासाठी विमानतळ संचालकांना निवेदन दिल्याचे सरदेसाईंची माहिती.

धावत्या कारमधून बिअर बाटल्या फेकल्याप्रकरणी एकाला अटक!

सुकूर तिस्क जंक्शनजवळ धावत्या कारमधून बिअर बाटल्या रस्त्यावर फेकल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी शंकर लाल खाटीक (32, जयपूर, राजस्थान) याला अटक केली असून रेंट-अ-कॅब देखल जप्त केली.

चालत्या कारमधून बिअर बाटल्या फेकल्याप्रकरणी एकाला अटक! 

सुकूर तिस्क जंक्शनजवळ चालत्या कारमधून बिअर बाटल्या फेकल्यामुळे पर्वरी पोलिसांनी शंकर लाल खाटीक (32, जयपूर, राजस्थान) याला रंगेहात पकडून अटक केली. तसेच याप्रकरणी रेंट-अ-कॅबदेखील ताब्यात घेतली आहे.

शापोरात पाणी समस्येने त्रस्त नागरिकांचा पाणीपुरवठा विभागावर मोर्चा!

शापोरा मधील बादे, बंदिरवाडा परिसरातील घरांना मागील महिन्यांपासून सुरळीत नळाचे पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी म्हापसा येथील साबांखाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.

यावेळी सहाय्यक अभियंता रणधीर अष्टेकर यांनी येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले

गावठी बॉम्बचा चावा घेतल्याने पाळीव कुत्र्याचा स्फोटात मृत्यू

लाटंबार्से डिचोली येथे पाळीव कुत्र्याने रानटी डुक्करांना मारण्यासाठी पेरून ठेवलेल्या गावठी बॉंब चा घेतला चावा. बॉंबस्फोट झाल्याने कुत्र्याचा झाला मृत्यू

चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याचे सौंदर्य खुलणार

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याचे सौंदर्य खुलणार. वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते 'इको-फ्रेंडली' प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ. 6 कोटी खर्च करून वॉक वे, बांबू ब्रिज, व्हिजिटर सेंटरसह अन्य सुविधा होणार उपलब्ध.

मुरगावात सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ!

मुरगाव पालिका नगराध्यक्ष गिरीश बोरकर तसेच इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत नगरसेवक दामोदर नाईक यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 13 लाख निधी खर्च करून सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ.

सर्व रेंट-अ-कारसाठी स्पीड गव्हर्नर अनिवार्य!

रेंट-अ-कारमुळे होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी गोवा सरकारने या वाहनांसाठी स्पीड गव्हर्नर बसवणे अनिवार्य केले असल्याचा आदेश वाहतूक खात्यातर्फे जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT