Goa Literacy Dainik Gomantak
गोवा

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

Goa literacy rate 99.72 percent: साक्षरता दरात गोवा देशात पहिल्‍या स्‍थानी पोहोचला आहे. २०२३–२४ मध्‍ये गोव्‍याचा साक्षरता दर ९३.६० टक्‍के इतका होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: साक्षरता दरात गोवा देशात पहिल्‍या स्‍थानी पोहोचला आहे. २०२३–२४ मध्‍ये गोव्‍याचा साक्षरता दर ९३.६० टक्‍के इतका होता. सद्यस्‍थितीत तो ९९.७२ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला असून याबाबतीत गोवा देशात अव्वलस्‍थानी पोहोचल्‍याचे केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार २०२२-२०२७ या कालावधीत देशभरातील निरक्षर व्यक्तींमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम (एनआयएलपी) योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील ज्यांनी शिक्षण घेतलेले नाही, अशांना लक्ष्‍य करून त्‍यांना साक्षर बनवण्‍यात येत आहे. एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे साक्षर घोषित करण्यासाठी ९५ टक्‍के किंवा त्याहून अधिक साक्षरता दर प्राप्त करणे हा निकष आहे.

त्‍यानुसार आतापर्यंत गोवा, हिमाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा आणि लडाख या राज्‍यांनी पूर्ण साक्षरता प्राप्त केली असल्‍याचेही मंत्री चौधरी यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

साक्षरतेत अव्वल राज्‍ये

राज्‍य टक्‍के

गोवा ९९.७२

हिमाचल प्रदेश ९९.३०

मिझोराम ९८.२०

लडाख ९७

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT