Truck carrying Goa liquor seized in Telangana Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Smuggling: नाकाबंदीला हुलकावणी, गोव्याची दारु तेलंगणात! ट्रकमधून 400 बाटल्या जप्त; अबकारी नाके कुचकामी

Goa liquor smuggling to Telangana: गोव्याच्या चारही दिशांना अबकारी विभागाची नाके, तपासणी आणि कडक बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असला, तरी गोव्यातून अन्य राज्यांमध्ये होणारी दारूची तस्करी थांबलेली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या चारही दिशांना अबकारी विभागाची नाके, तपासणी आणि कडक बंदोबस्त असल्याचा दावा केला जात असला, तरी गोव्यातून अन्य राज्यांमध्ये होणारी दारूची तस्करी थांबलेली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गोव्यातून आंध्र प्रदेशात नेण्यात येत असलेल्या सुमारे ४०० दारूच्या बाटल्या अनंतपूर जिल्ह्यातील ताडीपत्री येथे पोलिसांनी जप्त केल्या.

विशेष म्हणजे, तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकमध्ये दारू लपविण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले होते. ताडीपत्री रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाशेजारी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ताडीपत्रीचे निरीक्षक के. आरोहन राव आणि त्यांच्या पथकाने संशयावरून ट्रकची तपासणी केली.

ट्रकमध्ये सौंदर्यप्रसाधने आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची खोकी असल्याने सुरुवातीला दारूची वाहतूक होत असल्याचा संशय येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सखोल तपासणी केल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये तयार करण्यात आलेले विशेष कप्पे आढळले. त्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या लपविण्यात आल्या होत्या.

पोलिसांच्या तपासणीत आणखी धक्कादायक बाब समोर आली. या ट्रकवर कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश अशा दोन राज्यांच्या क्रमांकपट्ट्या आढळल्या. राज्यांच्या सीमांवरील तपासणी टाळण्यासाठी वाहनावर वेगवेगळ्या क्रमांकपट्ट्यांचा वापर केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी दारूसह ट्रक ताब्यात घेतला असून, या तस्करीमागे नेमके कोण व्यापारी आणि वितरक आहेत, याचा तपास सुरू आहे.

चारही सीमांवर नाके असूनही गोव्याची दारू सीमापार जात असेल, तर सीमेवरून तस्कर कसे सुटतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तपासणी यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह

गोव्याच्या चारही राज्यांच्या सीमांवर उत्पादन शुल्क विभागाची नाके कार्यरत असताना दारूचे ट्रक राज्याबाहेर पोहोचतात कसे, हा प्रश्न या कारवाईमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीमांवर तपासणी होत असेल, तर विशेष कप्पे तयार करून शेकडो बाटल्या भरलेला ट्रक तपासणी यंत्रणेला चकवा देत आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचतो कसा, याचे उत्तर आता अबकारी विभागाला द्यावे लागणार आहे. केवळ सीमा नाक्यांवर तपासणीचे फलक लावून तस्करी थांबणार नसेल, तर या नाक्यांची परिणामकारकता आणि तेथील तपासणी यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT