Lifeguards Dainik Gomantak
गोवा

Goa Lifeguardsकडून 6 मच्छीमार बांधवांना जिवनदान

मच्छीमार सोमवारी हवामानाचा अंदाज घेत समुद्रात मासेमारीसाठी उतरले होते.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कोलवा समुद्र किनाऱ्यावर (Colva Beach) मासेमारी (Fishing) करताना खवळल्याने समुद्रात बुडालेल्या एकूण सहा मच्छीमार बांधवांना वाचविण्यात दृष्टीच्या जीवरक्षकांना (Lifeguards) यश आले आहे.

मच्छीमार सोमवारी हवामानाचा अंदाज घेत समुद्रात मासेमारीसाठी उतरले होते. समुद्र अचानक खवळल्याने मच्छीमारांना स्थिर राहणे कठीण बनले तर मच्छिमारी मासेमारी जाळ्यासह समुद्रात ओढले गेले. त्यांना वाचविण्यासाठी बाकीचे मच्छीमार गेले असता तेही बुडायला लागले. हे किनाऱ्यावरील दृष्टी जीवरक्षकांना (Goa Lifeguards) लक्षात येताच दृष्टी जीवनरक्षक दशरथ सांगोडकर, पुनू वेळिप आणि सिद्धेश गावकर यांनी बचाव उपकरणासह समुद्रात जाऊन मच्छीमारांना वाचवले.

किनारी भागातील एसओपी

गोव्यात सध्या कोविडमुळे लागू केलेले निर्बंध शिथिल केलेले असले तरी रात्रीचा कर्फ्यू लागूच आहे. त्यानुसार मद्यालये, शॅक वगैरे किती वेळ खुले असावेत यावरही निर्बंध आहेत. पण, तरीही मध्यरात्री वा उत्तररात्रीही ती उघडीच असतात तसेच लोक समुद्रकिनाऱ्यावर फिरत असतात हे अनेक घटनांवरून दिसून येते. सासष्टीतील किनाऱ्यावरील असो वा सिद्धी नाईक प्रकरण असो ही सर्व या मुक्त संचाराचीच फलिते आहेत. जीन डिस्टीलर जय धवनचा बुडून झालेला मृत्यूही तेच दर्शवतो. संबंधित यंत्रणा त्याची दखल कधी घेईल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT