Goa Liberation Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation: ज्‍योती कुंकळकर यांच्‍या ‘गाेंय स्वातंत्र्याचे होमखण’ या माहितीपटाचे प्रदर्शन

Goa Liberation गोवा मुक्‍ती लढ्याचा इतिहास आजच्‍या पिढीला कळणे गरजेचे - कुंकळकर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liberation गोवा मुक्‍ती लढा ही केवळ एक ऐतिहासिक नोंद नव्‍हे तर तो स्वातंत्र्य सैनिकांच्‍या त्‍यागांचे आणि धैर्याचे एक धगधगते पान.

त्‍यामुळे या मुक्‍ती लढ्याची माहिती नव्‍या पिढीपर्यंत पोचणे अत्‍यंत गरजेचे असून त्‍यासाठी हा माहितीपट तयार केला गेला असे या माहितीपटाच्‍या निर्मात्‍या ज्‍याेती कुंकळकर यांनी सांगितले.

त्‍यांनी तयार केलेल्‍या ‘गाेंय स्वातंत्र्याचे होमखण’ या माहितीपटाचे चौगुले महाविद्यालयात आज प्रदर्शन करण्‍यात आले. यावेळी मडगावच्‍या हॉस्‍पिसियोतील डाॅक्‍टर सुप्रिया प्रभुदेसाई धोंड या उपस्‍थित होत्‍या.

हा माहितीपट पाहिल्‍यावर साडेचारशे वर्षांचा इितहास कुंकळकर यांनी अवघ्‍या एका तासात या माहितीपटातून प्रभावीपणे सादर केला असे शिफारस पत्र डॉ. प्रभुदेसाई यांनी दिले.

कुंकळकर यांच्‍या या माहितीपटाचे सध्‍या गोव्‍यातील वेगवेगळ्‍या शाळा आणि महाविद्यालयात प्रदर्शन केले जात आहे. या माहितीपटात गाेवा मुक्‍ती लढ्याची समग्र माहिती चित्रपट रुपात दाखविण्‍यात आली आहे.

आज झालेल्‍या कार्यक्रमाच्‍यावेळी चौगुले महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. संगीता साखळकर, संपदा कुंकळकर तसेच सरिता नाईक तारी हे उपस्‍थित हाेते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनेसा बार्रुश कुलासो यांनी केले तर आभार प्रदर्शन सरिता नाईक तारी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT