Goa Liberation Day Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा मुक्तीदिनाची जय्यत तयारी सुरु; सरकारद्वारे विविध ठिकाणी ध्वजारोहण होणार

Goa: गोवा राज्याच्या मुक्तीचा 61वा वर्धापनदिन 19 डिसेंबरला गोवा सरकारद्वारे साजरा केला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा राज्याच्या मुक्तीचा 61वा वर्धापनदिन सोमवार,19 डिसेंबर रोजी गोवा सरकारद्वारे साजरा केला जाणार आहे. राज्यस्तरीय ध्वजारोहण समारंभ गोवा विद्यापीठ मैदान (हेलिपॅड भाग) ताळगाव येथे होणार आहे. मुख्यमंत्री, सभापती, मंत्री, विरोधी पक्षनेते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ॲडव्होकेट जनरल आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राष्ट्रध्वज फडकवतील, संचलनाची पाहणी करतील आणि मानवंदना देतील. नंतर मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करतील. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील. यावेळी शालेय मुले सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता गीते, मास पिटी ड्रिल आणि राष्ट्रगीत गायन यांचे सादरीकरण करतील.

विविध तालुका मुख्यालयांत मंत्री, आमदारांच्या हस्ते सकाळी सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण समारंभ पार पडेल. मडगाव येथे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. फोंडा येथे कृषीमंत्री रवी नाईक ध्वजारोहण करतील.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हापसा येथे ध्वजारोहण करतील. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो वास्को येथे ध्वजारोहण करतील, वीजमंत्री सुदिन ढवळीकर काणकोण येथे ध्वजारोहण करतील. मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर पेडणे येथे ध्वजारोहण करतील. आमदार दिव्या राणे (पर्ये) वाळपई येथे ध्वजारोहण करतील.

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सांगे येथे ध्वजारोहण होईल. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते केपे येथे ध्वजारोहण होणार आहे. डिचोली येथे आमदार प्रेमेंद्र शेट (मये) ध्वजारोहण करतील आणि जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते धारबांदोडा येथे ध्वजारोहण होणार आहे. अशाप्रकारे गोवा मुक्तीदिनाची जय्यत तयारी सुरु आहे. गोवा मुक्तीदिन सरकारद्वारे साजरा केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

SCROLL FOR NEXT