Goa: Lorna Fernandes Talking in Program Dainik Gomantak
गोवा

Goa: मानवी तस्करीवर आळा घालण्यासाठी संघटित व्हा

गोव्यात मानवी तस्‍करीवर (Human Trafficking in Goa) आळा घालण्यासाठी संघटित होऊन काम करणे आवश्यक आहे.

Mahesh Karpe

सासष्टी : राज्यात (Goa) अलीकडे ऑनलाईनच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरू आहे. मानवी तस्करीस (Human trafficking) प्रोत्साहन देणारी ऑनलाईन वेबसाइट बंद पाडण्यासाठी पोलिस विभाग, पालिका, महाविद्यालयाकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. त्‍यामुळे गोव्यात मानवी तस्‍करीवर (Human Trafficking In Goa) आळा घालण्यासाठी संघटित होऊन काम करणे आवश्यक आहे, असे उद्‍गार गोवा महिला फोरमच्या अध्यक्षा लॉर्ना फर्नांडिस यांनी काढले.

मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये ‘जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवसा’निमित्त रोटरी क्लब मडगाव यांनी आयोजित केलेल्या जागृती कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अर्ज संस्थेच्या अध्यक्ष ज्‍युलियाना लोहार, अॅड. अबोना वालादारीस व इतर उपस्थित होते.

पालकांनी मुलांना रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ देणे योग्य नाही, हे खरे असले तरी राज्यात होणाऱ्या घृणास्पद गुन्ह्यांचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे. गोवा सरकारने अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोव्यातील सेक्स टुरिझमवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे लॉर्ना यांनी सांगितले.

गोव्यात आता रेड लाईट एरिया बंद झाले खरे, पण आता हाऊसिंग सोसायटींतून वेश्या व्यवसाय सुरू आहेत. किनारपट्टी भागात काही हॉटेल्स अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पाठबळ देत असून, त्‍यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच हाऊसिंग सोसायटीमधील लोकांनी जागृत राहणे गरजेचे आहे, असे जुलियाना लोहार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT