CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: केंद्राच्‍या योजना राबविण्‍यात गोवा अव्‍वल! 80% योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

Government Schemes in Goa: फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आयोजित ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

Sameer Panditrao

फोंडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, त्यावेळी त्‍यांनी देशात ‘अच्छे दिन’ येणारे असे जाहीर केले होते. हा त्‍यांचा शब्द खरा ठरला असून देशात ‘अच्छे दिन’ आले आहेत. केंद्र सरकारच्‍या ८० टक्के योजनांची गोव्‍यात प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असून, त्‍याबाबतीत राज्‍य अग्रेसर बनले आहे, असे उद्‌गार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या केंद्रातील सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्ताने फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आयोजित ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, उपसभापती जोशुआ डिसोझा, मुख्य सचिव डॉ. व्‍ही. कांदावेलू आणि मान्‍यवर उपस्‍थित होते.

वर्षभरात सतरा हजार ‘लखपती दीदी’ तयार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महिलांना स्वयंपूर्ण बनविण्याचा हा प्रयत्न असून सरकारची त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

‘कातकरीं’ना मुख्य प्रवाहात आणणार

पेडणे तसेच शिरोडा मतदारसंघातील निरंकाल भागात असलेल्या ‘कातकरी’ समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या लोकांना त्यांचे हक्क देण्याबरोबरच सद्यःस्थितीत दोघांना पेन्शन योजना व अन्‍य दोघांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT