Goa News | Sudip Tamhankar Dainik Gomantak
गोवा

Goa News: न्यायालयात गेल्या दहा वर्षांत केवळ एकच आरोपपत्र दाखल- सुदीप ताम्हणकर

Goa News: 'एसीबी' विभागाची अकार्यक्षमता दिसून येते, असा आरोप सुदीप ताम्हणकरांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे 1,785 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 1,690 प्रकरणे निकाली काढली. 95 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले, तर 29 छापे टाकून सरकारी कर्मचाऱ्यांना लाचप्रकरणी अटक केली. मात्र, या दहा वर्षांत एकच आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले.

दरम्यान, यावरून या विभागाची अकार्यक्षमता दिसून येते. राज्यात दक्षता सप्ताहाचे आयोजन करून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ही लोकांची फसवणूक असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केला.

गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कारकिर्दीत ८ ते ९ सरकारी कर्मचारी निलंबित झाले, तसेच १० ते १२ जणांची चौकशी सुरू आहे, ही माहिती त्यांनी उघड करावी. ज्यांच्याविरुद्ध दक्षता खात्यामार्फत चौकशी सुरू आहे, अशा अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागली आहे.

ज्या अधिकाऱ्यांची पात्रता नाही, त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे प्रमुख केले आहे. या विभागात गुन्हे नोंद असलेल्या प्रकरणांचा तपास संथ गतीने सुरू आहे. प्रलंबित प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांनी काय केले, याचेही स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.

भ्रष्टाचारात राजकारण्यांचाही सहभाग

यावर्षी या विभागाकडे 76 नवीन प्रकऱणे नोंद झाली, तर प्रलंबित प्रकरणे मिळून 100 तक्रारी निकालात काढल्या. भ्रष्टाचारात राजकारण्यांचा सहभाग असल्याने अधिकारीही घाबरत नाहीत. विविध महामंडळांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे.

तसेच, त्यांचे गेली काही वर्षे ऑडिटच झालेले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध माहिती देण्यासाठी सरकारने मोबाईल क्रमांक तसेच व्हॉटस्ॲप मोबाईल क्रमांक देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे, असे मत ताम्हणकर यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Mumabi Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

SCROLL FOR NEXT